Home »TV Guide» Amit Tandon Wife Ruby Is In Dubai Jail, Tv Actor Amit Tandon

टीव्ही अभिनेत्याच्या पत्नीने केला हा गुन्हा, गेल्या एक महिन्यापासून दुबईत भोगतेय तुरुंगवास

दिव्य मराठी वेब टीम | Aug 11, 2017, 17:28 PM IST

मुंबई - मागील काही दिवसांपासून अशी चर्चा होती की अमित टंडन आणि त्याची पत्नी रुबी लवकरच घटस्फोट घेणार आहेत. आता अशी बातमी समोर येत आहे की, अमितची पत्नी दुबईमध्ये तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुबई हेल्थ ऑथॅरीटीने सांगितले आहे की, रुबीने तेथील सरकारी अधिकाऱ्यांना धमकी दिली होती. यामुळे तिला अटक करुन अल राफा तुरुंगात ठेवले आहे. पत्नीची मदत करण्यासाठी अमित एकदा दुबईला गेला पण त्याला तिला जामिन मिळवून देण्यास अपयश आले. आता पुन्हा अमित दुबईला जाण्याच्या तयारीत आहे. पेश्याने डर्मेटोलॉजिस्ट आहे रुबी...
अमितची पत्नी पेश्याने डर्मेटोलॉजिस्ट आहे आणि अनेक सेलिब्रेटी तिचे क्लायंट आहेत. रुबी तुरुंगात असल्याने अमित फार चिंतेत आहे आणि त्याने सांगितले, रुबी एक उत्तम डॉक्टर आहे आणि नेहमीच लोकांच्या मदतीसाठी तयार असते. रुबीला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असे त्याने सांगितले.
पुढच्या स्लाईडवर वाचा, अमित आणि रुबीबद्दल काही खास गोष्टी...

Next Article

Recommended