आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Shoots The First Episode Of KBC 8

Pics: केबीसी-8च्या पहिल्या एपिसोडच्या शूटिंगमध्ये थिरकले बिग बी, स्पर्धकाने जिंकले 6.40 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेटवर पहिल्या स्पर्धकासोबत बसलेले बिग बी
सूरत: 'कौन बनेगा करोडपती' या टीव्ही शोचे आठवे पर्व सूरत (गुजरात)मध्ये लाँच करण्यात आले. मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत अनोख्या अंदाजात याचे लाँचिंग केले. यावेळी शोच्या पहिल्या एपिसोडचे शुटिंग करण्यात आले. त्यामध्ये पहिली स्पर्धक दीपा जगतियानी बिग बी यांच्या समोर हॉट सीटवर बसलेली होती. लाँचिंगवेळी बिग बी यांनी डान्सर्सच्या एका ग्रुपसह परफॉर्मन्स दिला. इव्हेंट विनोदवीर कपिल शर्माने होस्ट केला.
यावेळी कपिल म्हणाला, 'बिग बींसह पुन्हा एकदा स्टेज शेअर करतोय ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. केबीसीविषयी सांगायचे झाले तर माझ्या आईला मी शोच्या हॉट सीटवर मी बसलेला बघण्याची इच्छा होती. अखेर आज माझ्या आईची इच्छा पूर्ण झाली.'
लाँचिंगदरम्यान CID फेम दया आणि अभिजीत यांनी बिग बीं यांच्या 'बचके रहना रे बाबा' या प्रसिध्द गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एवढेच नाही, 'महाराणा प्रताप' फेम फैजल खाननेसुध्दा यादरम्यान धमाकेदार परफॉर्मन्स करून सर्वांची प्रशंसा मिळवली. नीति मोहन, मियांग चांग आणि अनुरुद्द दवसारख्या कलाकारांनीसुध्दा आपल्या एंटरटेनमेंटने प्रेक्षकांचे मन जिंकले. हा बिग शो 17 ऑगस्टपासून प्रसारित होणार आहे.
या लाँचिंग इव्हेंटमध्ये पहिली स्पर्धक ठरलेल्या दीपा जगतियान यांनी 6 लाख 40 हजार रुपये जिंकले. भावाच्या व्यवसायात मदत करणारी दीपाने क्विज गेम शोमध्ये 3 लाइफलाइन्स, ऑडियंस पोल, फोन ऑफ फ्रेंड आणि त्रिगुनीचा वापर केला. 7 कोटी रुपये जिंकण्यासाठी शोमध्ये तुम्हाला 14 प्रश्नांचे उत्तरे द्यावी लागणार आहेत. शो 17 ऑगस्टपासून सोनी एंटरटेनमेंट चॅनलवर प्रसारित होत आहे.
बिग बीही थिरकले
पहिल्यांदा केबीसीचा एपिसोड मुंबईच्या बाहेर शूट करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी गुजरातची निवड केली आहे. याचे कारण अमिताभ गुजरात पर्यंटनचे 'ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' आहेत. केबीसीच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी बिग बींनी 'मै हू डॉन' आणि 'पार्टी तो बनती है...'सह काही हिट गाण्यांवर ताल धरला होता. प्रेक्षकांना संबोधित करून गुजरातीमध्ये अभिवादन करत बच्चन म्हणाले, 'केम छो सूरत, मजा मा'. या पहिल्या एपिसोडमधील काही छायाचित्रे बिग बींनी फेसबुक अकाउंटवरही पोस्ट केली आहेत.

'कौन बनेगा करोडपती 8'च्या सूरतमध्ये शुट झालेल्या एपिसोडच्या सेटवरील काही खास छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...