आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'KBC 8'च्या मंचावर अमिताभ यांनी केले चिमुरडीचे बारसे, भेट म्हणून दिले सोन्याचे कंगन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('KBC 8'च्या सेटवर अमिताभ बच्चन आणि स्पर्धक खुशबू)
मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी काही भाग्यवंतानाच मिळते. हिच संधी मध्य प्रदेशातील अजयगढ येथील रहिवाशी असलेल्या खुशबू सिंहला मिळाली आहे. खुशबू बिग बींची मोठी चाहती आहे. बिग बींसमोर हॉट सीटवर बसण्याचे तिचे स्वप्न केबीसीच्या आठव्या पर्वात पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे केबीसीच्या मंचावर चक्क खुशबूच्या चिमुकल्या मुलीचे बारसे केले.
झाले असे, की खुशबू दोन वर्षांपूर्वी या शोच्या फास्टेस्ट फिंगर राउंडपर्यंतच पोहोचू शकली होती. हॉट सीटपर्यंत पोहोचण्यात ती अपयशी ठरली होती. खुशबूच्या कुटुंबीयांनी या अपयशासाठी तिच्या नवजात मुलीला जबाबदार ठरवले होते. त्यामुळे खुशबू खूप दुःखी झाली होती. समाजाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी खुशबूने कठोर मेहनत घेतली आणि यापर्वात केबीसीच्या हॉट सीटपर्यंत मजल मारली. येथे पोहोचून खुशबूने बिग बींकडे तिच्या मुलीचे नामकरण करण्याची विनंती केली.
जेव्हा खुशबूने आपली आपबिती बिग बींना सांगितली तेव्हा ते खूप भावूक झाले.
बिग बींनी भावूक होऊन त्यांची नात नव्या नवेलीच्या नावावर खुशबूच्या मुलीचे नाव 'नवेली' ठेवले. कुटुंबातील मोठ्या सदस्याप्रमाणे बिग बींनी खुशबू्च्या लेकीला सोन्याचे कंगन भेट म्हणून दिले आणि तिचे लाड केले.
कोन बनेगा करोडपतीचे आठवे पर्व 18 ऑगस्टपासून दर सोमवार ते गुरुवार रात्री साडे आठ वाजता छोट्या पडद्यावर प्रसारित होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कोन बनेगा करोडपती'च्या सेटवरुन घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे...