आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan's 'Yudh' Is Not Getting Good Respons

टीआरपीचे रेटिंग 'युद्ध' हरत आहेत बिग बी, घसरले शोचे रेटिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेल्या 'युद्ध' या पहिल्या टीव्ही शोच्या रेटिंगला या आठवड्यात अधिकच उतरती कळा लागली. गेल्या सोमवारी शोचे रेटिंग 0.7 इतके होते आणि आठवड्याच्या शेवटी ते 0.6 पर्यंतवर आले. पहिल्या भागानंतर कार्यक्रमासंबंधी प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी कार्यक्रमाला गुंतागुंतीचा असल्याचे म्हटले, तर काही जणांनी आताच कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया देणे उचित नसल्याचे मत व्यक्त केले.
अनुराग कश्यप यांनी 'युद्ध'ची निर्मिती केली आहे. कार्यक्रम प्रसारित होण्यापूर्वी त्याचा मोठय़ा पातळीवर प्रचार करण्यात आला होता. भारतीय टीव्ही कार्यक्रमाच्या तुलनेत हा शो खूप महाग आहे. प्रत्येक भागाचा खर्च 3 कोटी रुपये इतका आहे. या कार्यक्रमाची तुलना अनिल कपूरच्या '24'शी केली जात आहे जो कलर्सवर प्रसारित होत होता. या कार्यक्रमाचा टीआरपी 1.6 इतका राहिला होता.