आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या शाळेत अमिताभ ‘मास्तर’!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रुपेरी पडद्यावरील सुपरस्टार, अँग्री यंग मॅन बुधवारी चक्क गुरुजीच्या भूमिकेत शिरला. बृहन्मुंबई पालिकेच्या 80 शाळांतील विद्यार्थ्यांना बिग बीने चक्क 20 मिनिटे शिक्षक बनून धडे दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त पालिकेने राबवलेल्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. सत्ताधारी युतीने अमिताभ यांना खास निमंत्रण दिलेले होते. त्यानुसार दादर येथील पालिकेच्या स्टुडिओत सायंकाळी ते आले. ठरल्यानुसार 80 शाळांमधील विद्यार्थ्यांचा त्यांनी ‘लाईव्ह क्लास’ घेतला.
संकटांना घाबरू नका
विद्यार्थ्यांना अमिताभ यांनी काही कानमंत्र दिले. पालिकेच्या शाळेत शिकतो म्हणून कोणताही न्यूनगंड बाळगू नका. संकटांना कधीही घाबरू नका. संकटेच मोठे करतात, असे ते म्हणाले. जगण्यासाठी केवळ औपचारिक शिक्षण पुरेसे नाही याचे भान ठेवा, असा सल्ला अमिताभ यांनी दिला.
उपक्रम 400 शाळांत, 27 कोटींची तरतूद :
‘व्हर्च्युअल क्लासरूम’ उपक्रमाच्या दुसरा टप्पा बुधवारी सुरू झाला. आता 400 शाळांत प्रकल्प राबवला जाईल. त्यासाठी 27 कोटींची तरतूद आहे.
मी मुंबईकर, मुंबईसाठी समर्पित