आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Analysis Of Bigg Boss 8 For Day 6, Divya Marathi

Big Boss Analysis : सोनाली घरातून आऊट, आर्यला आवडतेय मिनिषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाली राऊत)

मुं‍बई - 'बिग बॉस-8'ला सुरु होऊन शनिवारी( ता. 27) एक आठवडा पूर्ण झाला.या दरम्यान अनेक आश्‍चर्यचकित करणारे पैलू समोर आले. जसे की बिग बॉसच्या घरातील बहुतेक सदस्य सोनाली राऊतच्याविरुध्‍द दिसले. बिग बॉसच्या नवे ठिकाण आणि आर्य बब्बरची अस्सल पसंत समोर आली आहे. प्रत्येक शनिवारी एव्हिक्शनचा असतो आणि चार स्पर्धकांमधून एकाला घरातून बाहेर जावे लागते. एक दृष्‍टीक्षेप शनिवारच्या हालचालींवर...

आर्य बब्बरची पहिली पसंत मिनिषा :
आठवड्याच्या शेवटी सलमानने आर्यला बिग बॉसमधील कोणाशी लग्न करशील असा प्रश्‍न विचारला होता. यास उत्तर देताना त्याने सर्वप्रथम मिन‍िषा लांबाचे नाव घेतले. गेल्या काही दिवशांपासून तो जास्त करुन करिष्‍माशी बोलताना दिसला. पण याबाबत आर्य म्हणतो की ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे. आर्यच्या उत्तराविषयी मिन‍िषाला विचारले असता ती म्हणाली माझ्यासाठी हे एक कॉम्प्लीमेंट आहे. पुढे कळलेच की मिन‍िषा आणि आर्यमध्‍ये काय चालू आहे .

विपरित घडामोडी
पहिल्या दिवसापासून वाटत होते की सोनाली घरातील इतर सदस्यांशी जुळून घेणार नाही. सलमानने स्पर्धकांना विचारले की कोणाला घराबाहेर काढले पाहिजे. सर्वांनी सोनालीचे नाव घेतले आणि शेवटी ती एव्हिक्ट झाली. सोनालीच्या एव्हिक्टला वेगळी कलाटणी मिळू शकते.

सलमानचे नताशाशी.. कुछ तो है
बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमधील स्त्री स्पर्धक सलमानबरोबर फ्लर्टिंग करताना दिसले आहेत. मागील सीझनमध्‍ये एली होती यावेळी नताशा स्टेनकोव्हिक. शनिवारी सलमान तिच्याकडून वेगवेगळ्या कृती करुन घेताना दिसला. जसे की डाळीची चव. त्याने नताशाच्या हिंदीचे कौतुक केले. तसेच पुनीत आणि प्रणीत या गुरुंकडून हिंदी शिकण्‍याचे तिला सुचवले.

प्रवाशी विमानातून प्रवेश करणार घरात
सलमानने शनिवारी सदस्यांना नव्या घराची झलक दाखवली. लवकरच बिग बॉसचे प्रवाशी घरात दाखल होणार आहेत, असे त्याने सांगितले.

सहाव्या दिवसातील हालचाली
आठवड्याच्या शेवटी बिग बॉसच्या घरात गट पडलेली दिसली. पुनीत इस्सरला सिक्रेट सोसायटीमधून बाहेर काढण्‍यात आले आणि विमानात तेरावा प्रवाशी म्हणून त्याला विमानात पाठवण्‍यात आले. एक ज्येष्‍ठ कलाकार म्हणून घरातील इतर सदस्यांनी त्याचा आदरच केला. मिन‍िषा आणि डिआंड्रा पुरुष प्रवाशांच्या कामगिरीशी असमाधानी दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा सहाव्या दिवशाची काही छायाचित्रे...