आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापल्या गेल्या होत्या लग्नपत्रिका, खासगी आयुष्यात 'अंगूरी भाभी' चढू शकली नाही बोहल्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'भाबीजी घर पर है' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणारी अंगूरी भाभी उर्फ अभिनेत्री शिल्पा शिंदे हिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. शिल्पाचे ठरलेले लग्न मोडल्याची गोष्ट फार कमी जणांना ठाऊक आहे. २००९ साली शिल्पाचे लग्न ठरले होते, लग्नपत्रिका छापल्या गेल्या होत्या. विवाहस्थळ निश्चित झाले होते. मात्र लग्नाच्या दोन दिवसाआधी शिल्पाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
कुणासोबत होणार होते शिल्पाचे लग्न आणि का तिने ते मोडले...
- शिल्पाचे लग्न टीव्ही अभिनेता रोमित राजसोबत जुळले होते. 'मायका' आणि 'माता-पिता के चरणों में स्वर्ग' या मालिकांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते.
- 'मायका' या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले होते.
- दोघांमध्ये प्रेम जुळले आणि त्यांचे लग्नही ठरले. २९ नोव्हेंबर २००९ रोजी गोव्यात दोघांचा लग्नसोहळा पार पडणार होता.
- शिल्पाने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, दोघांच्या लग्नाच्या पत्रिकासुद्धा छापल्या गेल्या होत्या. मात्र नंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली, की तिने स्वतः लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
अखेर काय होते कारण...
- शिल्पाने लग्न न करण्यामागचे कारण एका मुलाखतीत सांगितले होते.
- शिल्पाने सांगितल्याप्रमाणे, रोमित एक अॅडजस्टिंग हसबंड होऊ शकणार नाही, असे तिला वाटले.
- शिल्पाने रोमितला आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. मात्र रोमितने शिल्पाची गोष्ट समजून न घेता तिच्या कुटुंबीयांचा अपमान केला.
- या सगळ्या परिस्थितीमुळे शिल्पाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
- शिल्पाने सांगितल्याप्रमाणे, जेव्हा तिने आपला हा निर्णय रोमितला सांगितला, तेव्हा त्याने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
आता विवाहित आणि एक मुलीचा वडील आहे रोमित...
- शिल्पासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रोमितने पुण्याच्या टीना कक्कड नावाच्या तरुणीसोबत लग्न केले. २८ मार्च २०१० रोजी दोघांचे लग्न झाले.
- रोमित आणि टीनाला एक मुलगी असून तिचे नाव रिया राज आहे.
- शिल्पा आणि रोमित यांचे लग्न ठरले होते, त्यावेळी दोघांनीही रंजन शाही यांच्या माता पिता के चरणों में स्वर्ग या मालिकेत कॅमिओ भूमिका साकारली होती.
- खास गोष्ट म्हणजे ही कॅमिओ भूमिका वेडिंग सीन होता. यामध्ये दोघेही वर-वधू बनले होते आणि त्यांचे फ्रेंड्स दोघांना शुभेच्छा देत होते.
- त्या क्षणांची झलक बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...