आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर नाराज झाला अजय देवगण, शुटिंगविनाच गेला परत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अजय देवगण सध्या 1 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या त्याच्या 'बादशाहो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच निमित्ताने रविवारी अजय 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर पोहोचला. पण संतापलेला अजय देवगण शुटिंग न करताच त्याठिकाणाहून परतला. रिपोर्ट्सनुसार यामागचे कारण होस्ट कपिल शर्माचा पॅनिक अटॅकमुळे सेटवर पोहचू शकला नव्हता. 

वेळेआधीच पोहोचली होती 'बादशाहो'ची टीम.. 
कपिलने सर्व स्टार्सना सकाळी 11.30 वाजेचा वेळ दिला होता. चित्रपटाच्या हिरोईन्स म्हणजे ईशा गुप्ता आणि इलियाना डिक्रुज सकाळी 9 वाजता, इमरान हाश्मी 10.30 वाजता आणि स्वतः अजय देवगण सुमारे 11.00 वाजता त्याच्या व्हॅनिटी व्हॅनद्वारे पोहोचला होता. पण कपिल कुठेच दिसत नव्हता. 

हे होते नाराजीचे कारण.. 
- प्रोडक्शन टीमने कपिलला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो कुठे होता हे कुणालाही समजले नाही. 
- सेटशी संबंधित एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, कपिलचा फोनही यादरम्यान स्विच ऑफ होता. अनेक प्रयत्न केल्यानंतरही टीमला कपिलशी संपर्क करता आला नाही, तसेच त्यांच्याकडे बादशाहोच्या टीमला द्यायला योग्य उत्तरही नव्हते. 
- रिपोर्ट्सनुसार कपिलच्या या वर्तनामुळे अजय संतापला त्याने अर्धा तास वाट पाहिली आणि 11.30 ला तो परत गेला. 
- इमरान, ईशा आणि इलियानाही शुटिंग सोडून निघून गेले. 
- नंतर प्रोडक्शन टीमने स्टारकास्टला सांगितले की, कपिलची तब्येत ठिक नसून त्याला पॅनिक अटॅक आला आहे. त्यामुळे त्याचा फोनही अनरिचेबल होता. 

या स्टार्सबरोबरही कपिलने शूट केले आहे कँसल, वाचा पुढील स्लाइड्सवर...
 
बातम्या आणखी आहेत...