आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Kapoor And Madhuri Dixit Creates Magic On Jhalak Dikhla Ja

आपल्या लखनबरोबर थिरकली धक-धक गर्ल, बघा कशी केली धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर 'झलक दिखला जा'च्या सेटवर हजेरी लावली ती अभिनेता अनिल कपूरने. आपल्या आगामी '24' या टेलिव्हिजन शोच्या प्रमोशनसाठी अनिल 'झलक दिखला जा'च्या सेटवर आला होता.
शोमध्ये अनिल कपूरने हजेरी लावल्यानंतर इथे धमाल-मस्ती झाली नसेल तरच नवल. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरने या शोमध्ये भरपूर धमाल केली. या दोघांनीही आपल्या गाजलेल्या गाण्यावर ताल धरला.
राम लखन, बेटा यासह ब-याच गाजलेल्या सिनेमांमध्ये माधुरी आणि अनिल कपूर एकत्र झळकले आहेत. धक-धक गर्ल आणि लखनला एकत्र थिरकताना बघणे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक पर्वणी ठरली.
या शोची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...