आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी अशी दिसायची 'अनीता भाभी', आता शो सोडत असल्यामुळे आहे चर्चेत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'भाभीजी घर पर है' मध्ये अनीता भाभीची भूमिका साकारणारी सौम्या टंडन लवकरच हा शो सोडू शकते. रिपोर्ट्सनुसार सौम्याचा शोसोबतचा कॉन्ट्रॅक्ट पुर्ण झाला आहे. या भुमिकेला ती कंटाळली असल्यामुळे ती कॉन्ट्रॅक्ट री-न्यू करणार नाही. सौम्याचा जन्म 3 नोव्हेंबर, 1984 मध्ये भोपाळ येथे झाला. लवकर तिचे कुटूंब उज्जैनमध्ये शिफ्ट झाले. राइटरसुध्दा आहे सौम्या...

सौम्याने उज्जैनच्या सेंट मेरी कॉन्वेंट स्कूलमधून अभ्यास पुर्ण केला. ती कवयत्री आहे, तिने 'मेरी भावनाऐ' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. ती 6 वर्षांची असतानाच तिने लिहिणे सुरु केले. तिचे वडिल तिचे इंस्पिरेशन होते. सौम्याचे वडिल जीबी टंडन विक्रम यूनिव्हर्सिटी उज्जैनमध्ये इंग्लिश डिपार्टमेंटचे एचओडी होते. ते शेक्सपियर लिटरेचरचे एक्सपर्ट होते. इंग्लिश लिटरेचरच्या विविध शाखांवर त्यांनी 17 पुस्तक लिहिले आहेत.

2006 मध्ये सुरु केले काम
सौम्याने 2006 मध्ये पहिला टीव्ही शो 'ऐसा देश है मेरा' मध्ये काम केले होते. यामध्ये सौम्याने रस्टी देओलची भूमिका निभावली होती. यानंतर तिने 'मेरी आवाज को मिल गई रोशनी' मध्ये अॅक्टिग केली होती. सौम्या शाहरुख खानसोबत 'जोर का झटका' या रियालिटी शोमध्ये होस्ट म्हणून दिसली होती. याव्यतिरिक्त सौम्याने कॉमेडी सर्कस के तानसेन', 'मल्लिका-ए-किचन ऑन एयर' (2, 3, 4) आणि 'डान्स इंडिया डान्स' (1, 2, 3) सारखे टीव्ही शो होस्ट केले आहेत.
 
'जब वी मेट' मध्ये बनली करीनाची बहिण
2007 मध्ये सौम्याने डायरेक्टर इम्पियाज अलीची फिल्म  'जब वी मेट' मधून बॉलीवुडमध्ये एंट्री घेतली होती. या फिल्ममध्ये तीने गीत(करीना कपूर) च्या बहिणीचा रोल प्ले केला होता.
 
10 वर्ष डेटिंग केल्यानंतर बँकर बॉयफ्रेंडसोबत केले लग्न
मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये बातम्या आल्या होत्या की, सौम्याने आपला बँकर बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंहसोबत प्रायव्हेट सेरेमनीमध्ये लग्न केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागिल 10 वर्षांपासून सौम्या सौरभला डेट करत होते. सौरभ तिच्यासाठी मित्र आणि गाइड दोन्हीपण आहे. कॉलेजच्या दिवसांपासून ते एकमेकांना ओळखतात. हे कपल मुंबईमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा सौम्या टंडनचे निवडर 7 Photos...

 
बातम्या आणखी आहेत...