आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anjana Padmanabhan Became First Winner Of Indian Idol Junior

अंजना पद्मनाभन ठरली पहिली इंडियन आयडॉल ज्युनिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंजना पद्मनाभन पहिली इंडियन आयडॉल ज्युनिअरची विजेती ठरली आहे. अंजना बंगळूरुची राहणारी आहे.
दहा वर्षीय अंजनाला अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पहिली इंडियन आयडॉल ज्युनिअर ठरलेल्या अंजनाला 25 लाख रुपये, एक कार, पाच लाखांची एफडी आणि एका स्पॉन्सरकडून दोन लाख रुपये पुरस्काराच्या रुपात मिळाले.
अंजनाने म्हटले, की 'आम्ही सर्व एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलो, तरीदेखील आम्ही एका कुटुंबाप्रमाणे येथे राहिलो. एकत्र राहून आम्ही आनंद आणि दुःखाचे क्षण बघितले. विजेती ठरल्यामुळे मी खूप आनंदात आहे.'
या स्पर्धेत देवांजना मित्रा पहिली रनरअप ठरली तर अनमोल जसवाल आणि निर्वेश दवे दुस-या स्थानावर राहिले.
पुढे क्लिक करुन बघा अंजनाची खास छायाचित्रे...