आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankita And I Are Getting Married In December 2016, Confirms Sushant

सुशांतचा खुलासा, डिसेंबर 2016मध्ये करणार गर्लफ्रेंडसोबत लग्न!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे - Divya Marathi
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे दिर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्या आहेत. परंतु त्या अफवाच ठरल्या. परंतु यावेळी दोघांनी स्वत: कन्फर्म केले आहे, की ते यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठीत अडकणार आहेत.
अवॉर्ड नाइटमध्ये केला खुलासा...
अलीकडेच एका अवॉर्ड शोच्या पार्टीदरम्यान माध्यमांनी दोघांना लग्नाविषयी विचारले. यावर सुशांत म्हणाला, 'आम्ही डिसेंबर 2016मध्ये लग्न करणार आहोत.'
'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. या मालिकेत दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत होते. सुशांत सध्या महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर तयार होणा-या सिनेमात बिझी आहे. त्याचा सिनेमा नीरज पांडे दिग्दर्शित करत आहे. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो लग्नाच्या तयारीला लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुशांत आणि अंकिताचे सोबतचे निवडक फोटो... आणि तिस-या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...