(अंकिता लोखंडे)
मुंबई: सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आता स्पोर्टपर्सन बनली आहे. अलीकडेच, तिला क्रिकेटचा सराव करताना पाहिल्या गेले. तिच्यासह मेघना नायडू आणि निवेदिता बसुसुध्दा दिसली.
लवकरच बॉक्स क्रिकेट लीग (BCL)च्या नवीन सीजनची सुरुवात होत आहे. या सीजनमध्ये एक नवीन टीम दिसणार आहे. या टीमचे नाव कोलकाता बाबु मोशाय टीम, त्याची निर्मिती टीन्ही निर्माती निवेदिता बसुने केले आहे.
या टीममध्ये अंकिता लोखंडे, अभिनव शुक्ला, अभिजीत रावत, आलोक नरुला, अमित सरीन, अनुज सचदेव, अविनाश सचदेव, डिंपल झंगियानी, हितेन तेजवाणी, करण मेहरा, मेघना नायडू, नमन शॉ, निवेदिता बसु, राज सिंह अरोरा, सलिल आचार्य, शरद मल्होत्रा, सायंतनी घोष आणि सुमित सचदेव हे खेळाडू असतील.
टीमची टॅगलाइन 'व्ही प्ले टू विन' असून तुषार कपूर, श्वेता तिवारी आणि दिव्यांका त्रिपाठीला याचे ब्रँड अॅम्बेसडर बनवण्यात आले आहे. अभिनेता करण कुंद्रा आणि सुदीपा सिंह यांना याचे प्रमोटर्स म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फिल्डवर सराव करताना 'कोलकाता बाबू मोशाय' टीमच्या खेळाडूंची छायाचित्रे...