आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपनंतर या अॅक्टरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतेय सुशांतची Ex-GF!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकिता लोखंडे आणि कुशाल टंडन. कुशालने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. - Divya Marathi
अंकिता लोखंडे आणि कुशाल टंडन. कुशालने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
मुंबई: सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेची सध्या 'बिग बॉस 7'चा स्पर्धक कुशाल टंडनशी जवळीक वाढली आहे. असे आम्ही नव्हे, काही मीडिया रिपोर्ट्सने दावा केला आहे. अंकिता आणि कुशाल एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत असल्याचेसुध्दा बोलले जात आहे. मात्र, दोघांनी अद्याप याविषयी काहीच खुलासा केला नाहीये. परंतु कुशालने इंस्टाग्रामवर अंकितासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात दोघांची क्युट केमिस्ट्री दिसून येत आहे.
कुशालचेसुध्दा झाले आहे ब्रेकअप...
कुशाल आणि गोहरचे अफेअर 'बिग बॉस 7'दरम्यान सुरु झाले होते. दोघे या शोमध्ये स्पर्धक होते. ऑक्टोबर 2014ला त्यांच्या ब्रेकअपची माहिती स्वत: कुशालने दिली होती. त्याने सोशल साइटवर लिहिले होते, 'मित्रहो, आता गौशासारखे काहीच नाही. माफ करा, मी ही बातमी ब्रेक करतोय. गोहर आणि मी ब्रेकअप केले आहे.' गोहर आणि कुशालने दोघांचे नाव एकत्र करून गौशाल बनवले होते.
याचवर्षी झाले अंकिता-सुशांतचे ब्रेकअप...
- गेल्या काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतचे ब्रेकअप झाले. त्याने टि्वटरवर लिहिले होते, 'ना ती अल्कोहोलिक होती ना मी फ्लर्टी... दु:खद गोष्ट आहे, की लोक वेगळे होतात, ही वेळेची गोष्ट आहे...'
- एका नवीन रिपोर्टनुसार, दोघांच्या ब्रेकअपचे कारण पर्सनलपेक्षा जास्त प्रोफेशनल असल्याचे सांगण्यात आले होते.
- ऐकिवात आहे, की अंकिताला सुशांतसोबत सेटल होऊन मुल-बाळ हवे होते. परंतु सुशांतला संसार थाटण्याच्या मनस्थितीत नव्हता. अंकिता यामुळे सुशांतवर नाराज होती.
- सुशांतचे ज्या प्रॉडक्शन हाऊससोबत मतभेद सुरु आहेत, त्यांचा एका मोठा सिनेमादेखील अंकिताच्या हातून गेला. याच प्रॉडक्शन हाऊसच्या सिनेमातून सुशांतने डेब्यू केले होते.
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, तो सिनेमा सलमान खानचा आहे, जो यशराज बॅनरमध्ये बनत आहे.
- यशराजच्या तीन सिनेमांचा करार सुशांतने तोडला होता. त्याचे नुकसान अंकिताला भोगावे लागले.
6 वर्षे राहिले लिव्ह-इनमध्ये...
अंकिता आणि सुशांत 2009 मध्ये 'पवित्र रिश्ता' या झी टीव्हीवर प्रसारित होणा-या मालिकेत एकत्र दिसले होते. 2009मध्ये सुरु झालेला हा शो 2014मध्ये ऑफएअर झाला. 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर दोघांची जवळीक वाढली होती. मागील 6 वर्षांपासून अंकितासोबत लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या सुशांतने ब्रेकअपनंतर घर सोडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुशांत, अंकिता, कुशाल आणि गोहरचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...