ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे सध्या सामाजिक कार्यक्रमांबरोबरच ग्लॅम वर्ल्डमध्येही झळकत आहेत. अण्णांच्या आयुष्यावरील 'अण्णा : किसन बाबुराव हजारे' या चित्रपटाचे प्रमोशन सध्या अण्णा हजारे स्वतः करत आहेत. त्याच निमित्ताने नुकतेच अण्णा कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. शोमधील सदस्यांनी इतर सेलिब्रिटींप्रमाणेच अण्णांबरोबर धमाल केली आणि विशेष म्हणजे अण्णांनीही कार्यक्रम एन्जॉय केला.
अण्णा हजारेंनी एखाद्या टिव्ही शोमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ होती. अण्णांच्या शोमध्ये एन्ट्री झाल्यापासून मोठी धमाल याठिकाणी सगळ्यांनी केली. अली असगर, सुनील ग्रोवर यांनीही महिलांच्या वेशातील पात्राद्वारे अण्णांबरोबर गमती जमती केली. संपूर्ण शोमध्ये अण्णा हसत असल्याचे पाहायला मिळाले.
सुमारे एक वर्ष अण्णांच्या राळेगण सिद्धी या गावी या चित्रपटाचे शुटींग करण्यात आले. दीड तासाच्या या चित्रपटात नवी दिल्ली, जम्मू-काश्मीर, लद्दाख आणि राजस्थानातीलही शुटिंग आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अण्णा हजारेनी शोमध्ये कशी धमाल केली..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.