आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खतरों के खिलाडी'च्या टीमसोबत एअरपोर्टवर दिसला अर्जुन कपूर, अर्जेंटिनाला झाले रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जुन कपूर, जय भानुशाली, माही विज, सना सईद - Divya Marathi
अर्जुन कपूर, जय भानुशाली, माही विज, सना सईद

मुंबईः आगामी 'की अँड का'चे शूटिंग पूर्ण करुन अभिनेता अर्जुन कपूर अर्जेंटिनाला रवाना झाला आहे. 'खतरों के खिलाडी सीजन-7'च्या स्पर्धकांसोबत अर्जुन गुरुवारी मुंबई विमानतळावर दिसला. अर्जुनसोबत अभिनेता जय भानूशाली, माही विज, सना सईद, तनिषा मुखर्जी, सिद्धार्थ शुक्ला दिसले.
14 स्पर्धकांसोबत अर्जेंटिनात करणार शूटिंग
अर्जुन कपूर 'खतरों के खिलाडी सीजन-7'चा नवीन होस्ट आहे. या सीझनमध्ये एकुण 14 सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी झाले आहेत. ऐश्वर्या सखूजा, सिद्धार्थ शुक्ला, टीना दत्ता, हिमांशु मल्होत्रा, सना सईद, जय भानुशाली, माही विज, मुक्ति मोहन, राघव जुयाल, फैजल खान, पार्वती ओमनाकुट्टन, युवराज वाल्मीकि, विवान भटेना आणि तनिषा मुखर्जी या शोमध्ये समोरासमोर असणार आहेत. 14 स्पर्धकांची टीम अर्जेंटिनात महिनाभर शूटिंग करणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...