आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Armaan Asks Tanishaa To End Her Friendship With Andy

अरमानला खटकते तनिषा-अँडीची मैत्री, दिला दूर राहण्याचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 7'पासून सुरू झालेले अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जीचे नाते कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे. पुन्हा एकदा असाच प्रसंग घडल्याने ही जोडी चर्चेत आली आहे. बातमी आहे, की तनिषा आणि अँडी यांची मैत्री अरमानला पसंत नाहीये. त्याने तनिषाला ही मैत्री संपवण्यास सांगितले आहे.
तनिषा आणि अँडी 'बिग बॉस'च्या घरात असताना तुम्ही त्यांची मैत्री तर बघितलीच असेल. त्यांनी त्यांची मैत्रीसुध्दा सिध्द केली आहे. शोनंतर जेव्हा अरमान आणि तनिषा गोव्याला आणि दुबईला फिरण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत अँडीसुध्दा होता. सोशल साइट्सवर तिघांची छायाचित्रेदेखील समोर आली होती. 'बिग बॉस'च्या घरात अरमान अँडीचा तिरस्कार करायचा. म्हणून तनिषालासुध्दा त्याच्यासोबतची मैत्री तोडून टाकण्याचा सल्ला अरमानने दिला आहे.
सुत्राच्या सांगण्यानुसार, की अरमानने तनिषाला कडक शब्दात सांगितले आहे, की अँडीसोबची मैत्री तोडायची आणि त्याच्यापासून दुर राहायचे. तिला मात्र त्याचा हा निर्णय आवडला नाहीये. परंतु ऐकिवात आहे, की दोघे लवकर लग्न करणार असल्याने तिला त्याला नाराज करायचे नाहीये. असो, अरमनाने सांगितलेल्या गोष्टींचे पालन तनिषा नेहमीच करत असल्याचे आपण 'बिग बॉस'च्या घरात असल्यापासून पाहत आलो आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा तिघांची सोबतची गोव्याच्या टूरची काही खास छायाचित्रे...