(फाइल फोटो- अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी)
मुंबई: कलर्सवरील '
बिग बॉस 7'पासून चर्चेत आलेले लव्ह बर्ड्स अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी लवकरच लग्नगाठीत अडकणार असे बोलले जात आहे. दोघांच्या जवळचा मित्र आणि गायक मीका सिंहने याची माहिती दिली आहे. मीकाने टि्वट करून सांगितले, 'सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे, की अरमान आणि तनिषा लवकरच लग्न करणार आहेत. दोघांना शुभेच्छा द्या.'
मागील काही दिवसांपूर्वी अरमान-तनिषाच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु अलीकडेच, एका प्रसिध्द वर्तमानपत्रातील बातमीनुसार, इव्हेंटमध्ये दोघे एकत्र पोहोचले तेव्हा त्यांच्या ब्रेक-अपच्या अफवांवर पूर्णविराम लागला. 'बिग बॉस 7'मध्ये अरमान-तनिषाची हाउसमेट राहिलेली एली अवरामने टि्वटर या पार्टीचे एक छायाचित्रे पोस्ट केले होते. त्यामध्ये ती अरमान, तनिषा आणि अँडीसह दिसत होती. तिने या छायाचित्रासह लिहिले, की एका वर्षानंतर ती पुन्हा एकदा अरमान, तनिषा आणि अँडीसह वेळ घालवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मीका सिंह आणि एली अवरामचे टि्वट...