आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Armaan Kohli Requests Tanisha For Physical Relation

BIGG BOSS:अरमानने तनिषाकडे केली शारीरिक संबंधांची मागणी, प्राईम टाईममध्ये येणार शोवर बंदी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. या शोमधील स्पर्धक अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी शारीरिक संबंधांविषयी बोलताना कॅमे-यात कैद झाले आहेत. व्हडिओमध्ये अरमान तनिषाकडे शारीरिक संबंधांची मागणी करताना दिसतोय. विशेष म्हणजे तनिषासुद्धा आनंदात त्याला उत्तर देताना दिसत आहे.
तसे पाहता तनिषा आणि अरमान यांच्यातील जवळीक प्रेक्षकांनी पहिल्यांदाच बघितलेली नाहीये. यापूर्वी अनेकदा या दोघांचे आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाले आहेत. हे व्हिडिओ सेन्सॉरच्या कारणांमुळे टीव्हीवर प्रसारित झाले नाहीत, मात्र रिअ‍ॅलिटी शोच्या पडद्यामागे काय सुरु आहे, याची झलक नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. यापूर्वी शोमध्ये होणारी शिवीगाळ आणि आक्षेपार्ह दृश्यांमुळे 2010साली शोचे प्रसारण प्राईम टाईमऐवजी रात्री उशीरा करण्यात आले होते.
या पर्वातसुद्धा स्पर्धक शिवीगाळ आणि एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. शिवाय या पर्वाची सुरुवात अरमान आणि तनिषाच्या लव्ह स्टोरीने झाली. लव्ह स्टोरीपर्यंत सर्वकाही ठिक होते, मात्र काही दिवसांतच हे दोघे रात्रीच्या अंधारात एकमेकांना किस करताना दिसले होते. त्यानंतर हे दोघे घरात सेमी न्यूड अवस्थेत आढळले. मात्र आता जो व्हिडिओ लीक झाला आहे, त्यामध्ये अरमान आणि तनिषा घरातील गार्डन एरियात बसले आहेत आणि अरमान तनिषाकडे सेक्ससाठी रिक्वेस्ट करताना दिसतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या काय म्हणाला अरमान आणि बघा व्हिडिओतील काही छायाचित्रे...