टीव्ही शो 'एन्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा'च्या सेटवर अरमान आणि दीक्षा
मुंबई: करिश्मा आणि
करीना कपूरचा आतेभाऊ अरमान जैन सध्या त्याच्या पदार्पणाचा 'लेकर हम दिवाना दिल' सिनेमा प्रमोट करण्यात बिझी आहे. त्यासाठी तो काल (30 जून) इंटरनॅशनल शो 'एन्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा'च्या सेटवर पोहोचले होता. यावेळी त्याच्यासह सिनेमाची अभिनेत्री दीक्षा सेठसुध्दा दिसली. दीक्षाचाही हा पदार्पणाचा सिनेमा आहे.
दोन्ही स्टार्सनी 'एन्टरटेन्मेंट...'च्या सेटवर सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले, सर्वांना सिनेमा बघण्याची विनंतीही केली. यादरम्यान अरमान आणि दीक्षाने सेटवर फोटोग्राफीसुध्दा केली.
'लेकर हम दिवाना दिल'मधून दिग्दर्शक इम्तियाज अलीचा भाऊ आरिफ अली दिग्दर्शानाला सुरूवात करत आहे. सिनेमा दिनेश विजान, सुनील लुल्ला आणि
सैफ अली खानने निर्मिती केला आहे. तसेच सिनेमाला ए. आर. रहमानने संगीत दिले आहे. हा सिनेमा 4 जुलै रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'एन्टरटेन्मेंन्ट...'च्या सेटवर पोहोचलेल्या अरमान आणि दीक्षाची आणखी पाच छायाचित्रे...