आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरमानच नाव ऐकून भडकली तनिषा, म्हणाली आमची फक्त मैत्री...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तनिषाची वागणूक पूर्णत: बदलली आहे. बिग बॉसच्या घरात अरमान कोहलीसोबतची तिची जवळीक वाढल्याची चर्चा बरेच दिवस चालली होती. घराच्या बाहेर आल्यानंतर माध्यमांनी तिला अरमानविषयी विचारलं तर तनिषा भडकली. पत्रकारांवर चिडून तनिषा म्हणाली, की अरमान फक्त तिचा मित्र आहे. शोच्या दरम्यान अरमानने तिला फक्त मदत केली होती. 'बिग बॉस 7'च्या रनर-अपने सांगितलं, की अरमान आणि तिच्या मैत्रीविषयी तिच्या कुटुंबाला काही अडचण नाहीये. अरमान आणि तिच्या नात्याच्या गोष्टी फक्त अफवा आहेत.
तनिषा म्हणाली, की 'मला सुरुवातीपासूनच माहित होतं की गोहर शोची विजेती होणार आहे.' तिने सांगितलं की शोच्या बाहेर आल्यानंतर तनिषा बहिण काजलसोबत बोलली आहे आणि तीसुध्दा आनंदी आहे. माझी आई म्हणाली, की मी विजेता आहे, तर तिचे हे शब्दचं माझ्यासाठी सर्वकाही आहे. बिग ब्रदरमध्ये सहभाग घेण्याविषयी तिला विचारलं असता, ती म्हणाली, की मी बिग बॉसमध्ये सहभाग घेऊन समाधानी आहे. तनिषाने बिग ब्रदरमध्ये सहभाग घेण्यास नकार दिला. बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर जरी तनिषा अरमान आणि तिच्या नात्याला मैत्री सांगत असली, तरी बिग बॉसच्या घरात त्यांचे असे काही छायाचित्रे आहेत जे मैत्रीपेक्षा वेगळं नातं दर्शवतात.
पुढील स्लाइड्सवरुन जाणून घ्या तनिषा आणि अरमानची मैत्री आहे की आणखी काही...?