(निर्भय वाधवा, बरखा बिष्ट, ईशांत भानुशाली आणि आर्य बब्बर)
मुंबईः सोनी वाहिनीवर नव्याने दाखल झालेल्या 'संकट मोचन महाबली हनुमान' या पौराणिक मालिकेने
आपल्या वेगळ्या स्टाइलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडेच divyamarathi.com च्या टीमने शोच्या सेटवर भेट दिली आणि जाणून घेतले हे कलाकार भरजरी कपडे-दागिने घालून उन्हाळ्यात कसे काम करतात.
भरजरी कपडे परिधान करुन सेटवर तासन् तास काम करणे सोपे काम नाहीये. या शोमध्ये बाल हनुमाच्या आईची अंजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री बरखा बिष्टने सांगितले, ''खासगी आयुष्यात मी खूप भरजरी कपडे किंवा हेवी मेकअप करणे पसंत करत नाही. तुम्ही मला कधीही एवढ्या मेकअपमध्ये बघणार नाहीत. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मी एखाद्या मालिकेसाठी हेवी कपडे परिधान करत आहे. ही शोची मागणी होती. त्यामुळे अभिनेत्री म्हणून मी ती स्वीकारली. इतर कलाकारांपेक्षा मी लवकरच तयार होते. मला साधारण 40 ते 45 मिनिटे लागतात. हा गेटअप कॅरी करणे तसे अवघड काम आहे. कधी कधी चिडचिड सुरु होते. कारण 12 तास तुम्हाला हेवी मेकअप आणि दागदागिने घालून वावारावे लागते. ही माझी पहिलीच पौराणिक मालिका आहे. या मालिकांचे शूटिंग करणे तसे अवघडच काम आहे.''
शोमध्ये हनुमानाची भूमिका साकारणारे अभिनेता निर्भय वाधवा यांनी सांगितले, ''माझ्या कॉश्च्युमचे वजन चार किली आहे. 12 तास एवढे जड कपडे आणि चेह-यावर हेवी मेकअप घेऊन वावरणे कठीण होऊन जाते. मात्र मी हे आव्हान पेलत आहे.''
तर दुसरीकडे शोमध्ये बाल हनुमानाची भूमिका साकारणारा बालकलाकार ईशांत भानूशाली म्हणाला, ''ही भूमिका मी खूप एन्जॉय करतोय. मला तयार व्हायला 15 मिनिटे लागतात. माझी ज्वेलरी आणि कपडे खूप आरामदायक आहेत.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या मालिकेशी निगडीत खास छायाचित्रे...
सर्व छायाचित्रेः अजीत रेडेकर