आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashish Choudhary Won The Title Of 'Khatron Ke Khiladi'

आशिष चौधरी ठरला 'खतरों के खिलाडी'चा विजेता, 25 लाख आणि स्कॉर्पियो कारचा ठरला मानकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ट्रॉफीसोबत आशिष चौधरी)
मुंबईः बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता आशिष चौधरी 'खतरों के खिलाडी : डर का ब्लॉकबस्टर रिटर्न्स' या शोचा विजेता ठरला आहे. इकबाल खान, सागरिका घाटगे आणि मयांग चांग यांना मागे टाकत आशिषने हा किताब आपल्या नावी केला. आशिषने विजयाचा आनंद शेअर करताना म्हटले, की कलर्स चॅनलवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची त्याची इच्छा होती.
तो पुढे म्हणाला, ''मी विजेता ठरलो, यावर अद्याप माझा विश्वास बसत नाहीये. शोदरम्यान माझे संपूर्ण लक्ष स्टंट्स करणे आणि मित्र बनवणे यावर होते. सर्व स्पर्धकांसोबत मी खूप एन्जॉय केले. मी या शोमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सहभागी झालो होते. ती बनवण्यात मी यशस्वी झालो, याचा मला आनंद आहे. विशेष म्हणजे एकदाही मी एनिमेशनमध्ये आलो नाही. या शोच्या माध्यमातून माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.''
आशिषला पुरस्काराच्या रुपात 25 लाख रुपये आणि न्यू जनरेशन महिंद्रा स्कॉर्पिओ कार मिळाली आहे.