आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashish Sharma Of Jaipur Won The Trophy Of Jhalak Dikhhla Jaa 7

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपूरचा आशिष ठरला 'झलक दिखला जा'चा विजेता, पाहा पर्सनल लाइफ PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोच्या सातव्या पर्वाचा विजेता आशिष शर्मा आणि त्याची पार्टनर शंपा ट्रॉफीसोबत.)
जयपूरः टीव्ही अभिनेता आशिष शर्मा 'झलक दिखला जा' या सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शोच्या सातव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. त्याला पुरस्काराच्या रुपात 30 लाख रुपये आणि एक कार मिळाली आहे. करण टक्कर आणि शक्ति मोहन यांना मागे टाकत आशिषने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. जयपूरमध्ये जन्मलेला आशिष 'रंगरसिया' या मालिकेत रुद्र प्रताप राणावत या भूमिकेसाठी ओळखला जातो.
यापूर्वीही त्याने अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम केले आहे. 'चंद्रगुप्त' या मालिकेत त्याने सम्राट चंद्रगुप्तची भूमिका साकारली होती.
आयएएसचा मुलगा आहे आशिष...
राजस्थान कॅडरचे आयएएस यांचा मुलगा आहे आशिष शर्मा. वडील आयएएस असल्यामुळे तो शिस्तीच्या वातावरणात लहानाचा मोठा झाला. याच कारणामुळे आशिषला पोलिस आणि जेम्स बाँडच्या भूमिका साकारणे पसंत आहे. याशिवाय त्याला बालपणापासून स्केच काढण्याची आवड आहे.
गर्लफ्रेंड बनली रिअल लाइफ पत्नी...
आशिषने गर्लफ्रेंड अर्चना टेडसोबत लग्न केले. या दोघांची प्रेमकहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळी नाहीये. वडोदरा येथे एका शूटिंगदरम्यान स्टुडिओत दोघांची पहिली भेट झाली होती. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे त्यांनी आपल्या नात्याला लग्नाचे रुप दिले. अर्चना टीव्ही अभिनेत्री असून 'कबूल है' या मालिकेत ती काम करत आहे.
हनुमान चालिसा ठेवतो नेहमी जवळ...
आशिषचे निक नेम सनी आहे. तो नेहमी आपल्या पॉकेटमध्ये हनुमान चालिसा ठेवतो. ताण कमी करण्यासाठी तो मसाज करणे आणि सिनेमे बघणे पसंत करतो. आशिष शेक्सपिअरचा चाहता आहे. शॉपिंग करणे त्याला पसंत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा झलक...च्या विजेत्याची खासगी आयुष्याची खास छायाचित्रे...