आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashutosh Gowarikar And Shekhar Kapoor's New Serial On Lord Buddha

‘गौतम बुद्ध’ अवतरणार छोट्या पडद्यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखर कपूर आणि आशुतोष गोवारीकरची कल्पकता लवकरच छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. बॉलिवूडच्या या दिग्गज दिग्दर्शकांनी गौतम बुद्धांवर 50 भागांची एक मालिका बनवण्याचा विचार केला आहे. या मालिकेत राजकुमार सिद्धार्थ ते गौतम बुद्ध होण्याची कहाणी असणार आहे. झी टीव्हीवर सुरू होणार्‍या या मालिकेतील प्रत्येक भाग एका तासाच्या लघुचित्रपटाप्रमाणे दाखवला जाणार आहे.

या दोन्ही दिग्दर्शकांनी आधी गौतम बुद्धावर सिनेमा बनवण्याचा विचार केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर बनवण्यात येणार्‍या या सिनेमावर कोट्यवधी रुपयांच्या बजटची घोषणा केली होती. यात हॉलिवूडच्याही काही लोकांची नावे समोर आली होती. मात्र, काही कारणास्तव हा सिनेमा बनला नाही. त्यामुळे दोघांनी आता मालिका बनवण्याचा विचार केला आहे.