आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांची असताना लोक म्हणायला लागले 19 वर्ष मोठ्या अॅक्टरचे या अॅक्ट्रेसला दोन मुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अविका गौर आणि मनीष रायसिंघानिया. - Divya Marathi
अविका गौर आणि मनीष रायसिंघानिया.
मुंबई - 'बालिका वधू' आणि 'ससुराल सिमर का' सारख्या सीरियल्समधून प्रेक्षकांसमोर आलेल्या अविका गौर हिने तिच्या आयुष्यासंबंधीचे चकित करणारे खुलासे केले आहे. ती म्हणाली, जेव्हा मी 13 वर्षांची होते तेव्हा माझ्यापेक्षा 19 वर्ष मोठ्या मनीष रायसिंघानिया या कलाकारासोबत माझे नाव जोडण्यात आले होते. एवढेच नाही, तर अविकाचे म्हणणे आहे, मी 14 वर्षांची असताना आमच्याबद्दल अशा वावड्या उठवल्या जात होत्या, की मनीष यांच्यापासून मला दोन मुले झाली आहेत. DivyaMarathi.com ला दिलेल्या खास मुलाखतीत अविकाने हे खुलासे केले आहेत. 
 
- अविकाने सांगितले, 'मनीष आणि मी चांगले मित्र आहोत, लोक आमच्याबद्दल काय म्हणतात याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, मी अवघी 13 वर्षांची होते तेव्हा मनीष यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा त्यांचे वय 32 वर्षे होते. माझ्या पेक्षा 19 वर्षे मोठ्या अॅक्टरसोबत लोकांनी माझे नाव जोडले होते. आमच्या नसलेल्या अफेअरची मीडियामध्ये जोरदार चर्चा होती. एवढ्यावरच लोक थांबले नाही तर आमचे दोन मुले देखील असल्याचे सांगितले जात होते. बातम्यांमध्ये असेही लिहिले जात होते, की आम्ही मुलांना लपवून ठेवले आहे. अशा बातम्यांमुळे मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कमकुवत झाले होते, आजारी राहायला लागले होते.' 
- 'करिअरच्या सुरुवातीला अशा अफवांमुळे माझे कामावरचे लक्ष्य विचलीत होत होते. त्यामुळे आम्ही एकमेकांना टाळायला लागलो होतो. आम्ही बोलणेही बंद केले होते. मात्र लोकांच्या चर्चा काही थांबल्या नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मित्र झालो, हे ठरवून करण्यात आले होते. आमच्यात कधीही रोमँटिंग इन्व्हॉलमेंट नव्हती.' 
रोमँटिंग इन्व्हॉलमेंट नव्हती.' 
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मग कोणाला डेट करते अविका... 
बातम्या आणखी आहेत...