आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हा आहे खरा \'Bigg Boss\', भारदस्त आवाजाने घरात गाजवतो हुकूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'बिग बॉस चाहते है...' हे वाक्य तुम्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या प्रत्येक पर्वात नेहमी ऐकले असेल. परंतु तुम्ही कधी विचार केला का, 'बिग बॉस'च्या बॅकग्राऊंडमध्ये घूमणारा हा आवाज कुणाचा आहे. या पर्वाविषयी बोलले जाते, की 'बिग बॉस'च्या घरात जो आवाज सदस्यांवक हुकूम चालवतो, अनेक कठिण टास्क करून घेतो, गरज पडली तर शिक्षाही देतो, तो आवाज अतुल कपूरचा आहे.
अतुल कपूर एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि मुंबईचा रहिवासी आहे. बातम्यांनुसार, 'बिग बॉस'च्या घरात अतुलची एक वेगळी खोली आहे, तिथे तो घरातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतो. असेही नाही, की घरातील सदस्यांना घरात घुमणारा आवाज कुणाचा आहे, हे ठाऊक नाहीये किंवा ते त्या व्यक्तीला भेटलेले नाहीये. अनेक माजी स्पर्धक अतुल कपूरला भेटलेले आहेत. अरबाज खान आणि सोनाक्षी सिन्हासारखे अनेक सेलिब्रिटीसुध्दा अतुलला भेटले आहेत.
divyamarathi.com आज या पॅकेजमधून तुम्हाला 'बिग बॉस'च्या भारदस्त आवाजाच्या व्यक्तीला भेटवणार आहे. अतुल कपूरची सेलेब्ससोबतची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...