आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविका गौर म्हणाली, मनीष माझ्या वडिलांपेक्षा थोडाच लहान, त्यामुळे रोमांसचा स्कोपच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष रायसिंघानी आणि अविका गौर. - Divya Marathi
मनीष रायसिंघानी आणि अविका गौर.
मुंबई - टिव्ही शो 'ससुराल सिमर का' मधील अभिनेत्री अविका गौर (19) आणि मनीष रायसिंघानी (37) यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच चर्चेचा विषय बनली आहे. दोघांमध्ये 18 वर्षांचे अंतर असूनही ते डेटींग करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र या जोडीने कधीही ते मान्य केले नाही. अखेर अविका आणि मनीषने या सर्व अफवांवर बाळगलेले मौन सोडले आहे. 'बालिका वधू'मध्ये आनंदीच्या भूमिकेने प्रसिद्ध झालेल्या अविकाच्या मते, मनीष तिच्या वडिलांपेक्षा अवघ्या काही वर्षांनी लहान आहे. त्यामुळे डेटींगचा स्कोप नाही. 

नात्यावर स्पष्टपणे बोलली.. 
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अविकाने, मनीष आणि तिच्या नात्याबाबत बोलताना म्हटले की, मनीष माझ्या वडिलांपेक्षा अवघ्या काही वर्षांनी लहान आहे. त्यामुळे आमच्यात रोमँटिक रिलेशनशिपला काही स्कोप नाही. पण आमची मैत्री अनोखी आहे, ती कशी हे समजावून सांगता येणार नाही. अंडरस्टँडींग, रिस्पेक्ट, प्रामाणिकपणा आणि मॅच्युरिटीवर ती आधारित आहे. आम्ही  बीएफएफ (Best Friends Forever) आहोत. मी त्याला शिन चॅन (कार्टून कॅरेक्टर) म्हणते तर तो मला अजूनही मिजी (शिन चॅनची आई) म्हणतो. आम्ही आदरपूर्वक ही मैत्री टिकवली आहे. आम्ही चांगले मित्र आहोत आणि कायम राहू. त्याला डेट करण्याचा माझा काहीही विचार नाही. 

मनीष म्हणाला, माझ्यापेक्षा अर्ध्या वयाची आहे अविका 
अविकाबरोबरच्या नात्याबाबत बोलताना मनीष म्हणाला,  या गॉसिपने सुरुवातीला मला त्रास झाला. त्यामुळे मी अविकापासून लांब राहायचो. पण मी मूर्ख होतो. यादरम्यान माझी चिडचिड वाढली होती. या अफवांनी मला आजारी पाडले. पण नंतर माझ्या लक्षात आले की, जर माझा हेतू चांगला असेल तर मी तिच्याशी वेगळ्या प्रकारे वर्तन का करू, मी कधीही तिला डेट केले नाही. ती जवळपास माझ्यापेक्षा अर्ध्या वयाची आहे. आमची बाँडींग चांगली आहे. मी कधी तसा विचार केला नाही. पण आता मला त्याचा त्रास होत नाही. आम्ही केवळ कामाच्या संदर्भात भेटतो. 

शॉर्ट फिल्ममध्येही केले काम 
2011-16 दरम्यान टिव्हीवर प्रसारीत झालेल्या 'ससुराल सिमर का' शोमध्ये मनीष-अविकाने पती पत्नीची भूमिका केली होती. त्याशिवाय दोघांनी 'अनकही बातें' या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले. ही फिल्म 2016 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सलेक्ट करण्यात आली होती. सोशल मीडियावरही या दोघांची बाँडींग पाहायला मिळते. मनीष आणि अविकाने एकमेंकांबरोबरचे अनेक फोटो पोस्ट केलेल आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अविका गौर आणि मनीष रायसिंघानी यांचे Photos...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...