आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कजाकिस्तानमध्ये 'बालिका वधू' आहे सुपरस्टार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बालिका वधू'मध्ये आनंदीची भूमिका साकारणारी आणि सर्वाधिक चर्चेतील टीव्ही अभिनेत्री अविका गौर मध्य अशिया कजाकिस्तानमध्ये देशात सुपरस्टार आहे, असे सांगितले जात आहे. अलीकडेच, अविकाला कजाकिस्तानमध्ये आमंत्रित करण्यात आले होते.
सांगितले जात आहे, की या देशात बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यानंतर आता अविका अशी दुसरी अभिनेत्री आहे जिचे फॅन फॉलोइंग इतके जास्त आहेत. कजाकिस्तानमध्ये अविकाची 'बालिका वधू' ही टीव्ही मालिका प्रसारित केली जात आहे.
अविकाच्या लोकप्रियतेकडे बघून तेथील स्थानिक ब्रॉडकास्टर 'ससुराल सिमर का' या तिच्या मालिकेचे अधिकार खरेदी करण्याचा विचार करत आहेत. त्यामध्ये अविकाने एक भूमिका साकारली आहे. कजाकिस्तानच्या ट्रीपबद्दल अविका म्हणते, 'मला तिथे गेल्यानंतर ठाऊक झाले, की आनंदी लोकांच्या मनात किती घर करून बसली आहे. तेथील लोकांना भेटून मला खूप आनंद झाला.'