मुंबईः डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंह यांना '
बिग बॉस डबल ट्रबल' (Bigg Boss 9) या वादग्रस्त शोसाठी विचारणा झाली आहे. एका लीडिंग न्यूज वेबसाइटच्या मते, स्वतः राम रहीम यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
राम रहीम यांनी सांगितले, ''बिग बॉसमध्ये मी यावे, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. मात्र मी जाऊ कसे? एकदा घरात गेल्यानंतर बाहेर पडता येत नाही, हा या शोचा नियम आहे. मात्र मला रोज अनेक लोकांना भेटावे लागते, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या असतात.''
बाबा राम रहीम सध्या त्यांच्या आगामी 'MSG 2' या सिनेमाच्या रिलीजच्या कामात बिझी आहेत. या सिनेमाचे ते अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. सिनेमाची रिलीज डेट अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
अभिनेता डिनो मोरियाशीसुद्धा निर्मात्यांनी साधला संपर्क
बातम्यांनुसरा, 'राज', 'गुनाह' आणि 'अॅसिड फॅक्ट्री' या सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता डिनो मोरियाला बिग बॉसच्या नवीन पर्वासाठी विचारणा झाली आहे. मात्र अद्याप डिनोने याविषयीही काहीही उघड केलेले नाही.
सलमानने केली मानधनात वाढ
नेहमीप्रमाणे यंदाचेही पर्व सुपरस्टार सलमान खान होस्ट करणार आहे. सलमानने 'बिग बॉस 8' मधून मध्येच काढता पाय घेतला होता. त्यावेळी 'बिग बॉस'मध्ये परतणार नसल्याचे संकेत त्याने दिले होते. मात्र ताज्या बातम्यांनुसार, 10 कोटींच्या मानधनावर सलमान या शोमध्ये परततोय. प्रत्येक एपिसोडसाठी सलमान 10 कोटींचे मानधन घेणार असल्याचे समजते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या सेलेब्सची नावे आली आहेत पुढे...