आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'तारक मेहता...\' च्या बबीताजींनी टीव्हीच्या रामसोबत केला जोरदार डान्स, समोर आला व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही वरील राम उर्फ गुरमीत चौधरी आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची बबीताजी उर्फ मुनमुन दत्ता यांचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. गुंडे फिल्ममधील 'तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटियां रे...' या गाण्यावर दोघे थिरकताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ गुरमीतने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो त्याच्या मित्रांसोबत जोरदार डान्स करताना दिसतो. 

 

बेस्ट फ्रेंडच्या लग्नात धरला ठेका... 
- गुरमीतने शेअर केलेला डान्स व्हिडिओ, त्याचा बेस्ट फ्रेंड टीव्ही अॅक्टर सौरभ पांडेच्या साखरपुड्याचा आहे. 
- टीव्ही शो 'सूर्यपुत्र कर्ण' फेम सौरभने 26 नोव्हेंबरला त्याची गर्लफ्रेंड जारा सोनीसोबत साखरपुडा केला. यावेळी दोघांच्या मित्रांनी जोरदार डान्स केला होता. 
- सौरभ आणि जारा सोनी 28 नोव्हेंबरला मुंबईत काही निवडक मित्रांच्या साक्षीने विवाहबद्ध होत आहेत.  
- सौरभने सांगितले, की गेल्या 10 वर्षांपासून आम्ही एकमेकांना डेट करत होतो. आम्ही फार विचार केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला आहे. 


पुढील स्लाइडमध्ये पाहा, सौरभ - जारा सोनीच्या साखरपुड्यात टीव्ही स्टार्सची धमाल... 

बातम्या आणखी आहेत...