आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bade Acche Lagate Hai Tv Serial 4 Years Completed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बडे अच्छे लगते हैं’ मालिका चौथ्या वर्षात; प्रेक्षकांच्या प्रेमाने एकता कपूरही भारावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोनी टीव्हीवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार्‍या ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेने नुकतेच चौथ्या वर्षात पर्दापण केले आहे. मात्र, यात ऑन स्क्रीन राम व प्रिया यांच्या मुलीची भूमिका करणारी पिहू म्हणजेच अमृता मुखर्जी हिने या मालिकेला गुडबाय केला आहे. त्यामुळे अनेकांना तिच्या निर्णयाचा धक्का बसला आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी सोनी या वाहिनीवर या मालिकेची सुरुवात झाली होती. त्यानंतर ही मालिका अनेक कारणांमुळे कायम चर्चेतच राहिली आहे. ‘बडे अच्छे’मध्ये राम व प्रिया यांनी वेगळ्या धाटणीने भूमिका साकारल्या आहेत. लग्नानंतर त्यांच्यात अचानक प्रेम बहरते, अशी या मालिकेची थीम आहे. गेल्या वर्षी राम व प्रिया यांच्यात चित्रित झालेल्या हॉट सीनने बरीच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली, तर काहींना त्यांच्या या सीनबाबत आक्षेप नव्हता. तरीदेखील ही मालिका तीन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे हे या मालिकेचे यश असल्याचे निर्माती एकता कपूरने सांगितले.

प्रमोशनचा नवा फंडा
छोट्या पडद्यावरील बिग बॉस असलेली एकता कपूर ही अनेक चित्रपटांचीही निर्मिती करत असते. गेल्या काही वर्षांत ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेच्या माध्यमातून तिने आपल्या अनेक चित्रपटांचे प्रमोशन केले आहे. काही महिन्यांपूर्वी ‘शूट आऊट अ‍ॅड वडाळा’ची टीम जॉन अब्राहमसह उपस्थित होती, तर अभिनेत्री विद्या बालन, तुषार कपूर आणि इतर कलकारांनी अनेकदा मालिकेच्या सेटवर हजेरी लावली आहे.

पुढे वाचा... पिहू घेणार मालिकेचा निरोप...