Home »TV Guide» Bajirao Aka Rudra Soni Off Screen

या घरात वास्तव्याला आहे TV चा 'बाजीराव', साकारली होती रणवीर सिंहच्या मुलाची भूमिका

किरण जैन | Mar 16, 2017, 12:01 PM IST

मुंबईः 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात रणवीर सिंहच्या मुलाची भूमिका वठवणारा बालकलाकार रूद्र सोनी आता 'पेशवा बाजीराव' या मालिकेत बाजीची भूमिका साकारतोय. या भूमिकेसाठी त्याचे सर्वत्र कौतुक होतंय. अलीकडेच divyamarathi.com ला रुद्रच्या घरी भेट देण्याची संधी मिळाली. मुंबईतील एका उपनगरात वास्तव्याला आहे. गप्पा मारताना रुद्र त्याच्या कॅरेक्टरच्या अगदी विरुद्ध असल्याचे समजले. रुद्र म्हणाला, "माझा स्वभाव थोडा खट्याळ आहे, तर बाजी मात्र अतिशय शिस्तबद्ध आहे."

आणखी काय म्हणाला रूद्र...
रूद्रने पुढे सांगितले, "बाजीच्या भूमिकेसाठी मी हॉर्स रायडिंगपासून तलवारबाजी शिकलो. सुरुवातीला हे सर्व थोड अवघड होतं. पण आता मी ही भूमिका खूप एन्जॉय करतोय. रुद्र आणि बाजी अतिशय वेगळे व्यक्तिमत्त्व आहेत. मला माझ्या भूमिकेच्या अतिशय खोलवर शिरावं लागतं."

शूटसाठी दररोज करावे लागते टक्कल
रुद्रला शूटपूर्वी दररोज केस ट्रिम करावे लागतात. याविषयी तो सांगतो, "माझे केस खूप पटकन वाढतात. त्यामुळे सेटवर जाण्यापूर्वी मी माझ्या हेअर ड्रेसरला दररोज केस ट्रिम करायला सांगत असतो."

या मालिकांमध्ये झळकला आहे रुद्र
'बालवीर' या मालिकेतील मानवच्या भूमिकेतून रुद्र लोकप्रिय झाला. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आणि 'बालिका वधू' या मालिकांमध्ये रुद्र झळकला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रूद्र सोनी आणि त्याचे घराचे खास फोटोज आणि सोबतच जाणून घ्या त्याच्याविषयी बरेच काही..

सर्व फोटोज : अजीत रेडेकर

Next Article

Recommended