आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Bajrangi Bhaijaan' Promotion On The Sets Of 'Indian Idol Junior'

PIX : 'इंडियन आयडॉल'च्या सेटवर सलमानने छेडले सूर, सोनाक्षीसोबत लावले ठुमके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेटवर स्पर्धक आणि सोनाक्षी सिन्हासोबत सलमान खान)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनच्या निमित्ताने त्याने अलीकडेच इंडियन आयडॉल ज्युनिअरच्या सेटवर हजेरी लावली. येथे सलमानने शोची जज सोनाक्षी सिन्हा आणि स्पर्धकांसोबत भरपूर धमाल मस्ती केली.
यावेळी सलमान नेवी ब्लू शर्ट आणि डेनिम्समध्ये दिसला. येथे त्याने लहान मुलांसोबत डान्स केला, गाणे गायले आणि सेल्फीसुद्धा काढले. सोबतच 'बजरंगी भाईजान' स्पेशल लॉकेटसुद्धा मुलांना गिफ्ट केले. सलमानसोबत गायक अदनान सामी यांनीही या सांगितिक कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. अदनान यांनी 'बजरंगी भाईजान'मधील 'भर दे झोली' हे गाणे स्वरबद्ध केले आहे.
शूटिंग संपल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने सलमान आणि अदनान यांच्यासोबतचे एक छायाचित्र शेअर करुन ट्विट केलं, "Ladko ka bhai, n ladkiyon ka jaan... Bajrangi Bhai-jaan n adnan sami with us! Lelele selfie lele re!! #IndianIdolJr"
पुढे पाहा, 'इंडियन आयडॉल'च्या सेटवर पोहोचलेल्या सलमान खानची छायाचित्रे...