आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balika Vadhu Fame Neha Marda Celebrates Birthday With Dainikbhaskar.Com

29 वर्षांची झाली टीव्ही अभिनेत्री नेहा मर्दा, पाहा BIRTHDAY सेलिब्रेशनचे Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नेहा मर्दा)
मुंबईः 'बालिका वधू' फेम टीव्ही अभिनेत्री नेहा मर्दाने अलीकडेच आपला 29वा वाढदिवस साजरा केला. 23 सप्टेंबर रोजी नेहाने dainikbhaskar.com सोबत आपला वाढदिवस साजरा केला. सध्या नेहा 'डोली अरमानों की' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. सततच्या शूटिंगमुळे नेहाला यंदा आपला वाढदिवस सेटवरच साजरा करावा लागला.
यावेळी नेहाने सांगितेल, "खरं तर आज मला सुटी होती. मात्र आज जर मी शूटिंग केले नसते, तर टेलिकास्ट अपूर्ण राहिले असते, म्हणून मी सूटी रद्द केली. पण वाढदिवसाच्या निमित्ताने आज रात्री मी एक छोटीशी पार्टी आयोजित केली आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. माझा आउटफिट सिलेक्ट करण्यासाठी मला डिझायनरकडे जायचे आहे. माझा वाढदिवस आहे आणि हा स्पेशलच होणार आहे."
नेहाने dainikbhaskar.comसोबत पार्टीत येणा-या पाहुण्यांची यादी शेअर केली. तिने सांगितले, "मी माझ्या कुटुंबासोबत म्हणजेच शोच्या टीमसोबत सेटवर एक छोटी पार्टी सेलिब्रेट करणार. रात्री आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत मोहित रैना, प्रत्युषा बॅनर्जी, सिद्धार्थ शुक्ला, स्मिता बन्सलसह जवळचे काही मित्रमैत्रिणी सहभागी होणार आहेत."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा dainikbhaskar.com आणि टीम मेंबर्ससोबत नेहाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची काही छायाचित्रे...