आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balika Vadhu Fame Pratyusha Banerjee Suicide Case

शेवटच्या दिवशी अशी झाली होती प्रत्युषाच्या घराची अवस्था, बालपणीच झाली होती ही भविष्यवाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 1 एप्रिल रोजी प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आणि सर्वत्र खळबळ उडाली. मीडिया रिपोर्टनुसार प्रत्युषाचे आजोबा विरेंद्र नाथ बॅनर्जी यांनी प्रत्युषाच्या मृत्यूबाबतची भविष्यवाणी तिच्या लहानपणीच केली होती. प्रत्युषाचे आजोबा इंजिनिअर होते. ते तारापोर अॅटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये काम करत होते. तसेच जमशेदपूरचे प्रसिद्ध ज्योतिष अशीही त्यांची ओळख होती. प्रत्युषा आपल्या आजोबांचे ज्योतिष तंतोतंत मानत असे.
आकस्मिक मृत्यूची केली होती भविष्यवाणी
प्रत्युषाच्या वडिलांनी एका पत्रकार परिषदेत ही सांगितले होते की, प्रत्युषा ज्योतिष, भविष्य या गोष्टी खूप मानत असे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी देखील वडिलांना आपल्या भविष्याबद्दल विचारलं होतं. प्रत्युषा जेव्हा लहान होती तेव्हा त्यांनी भविष्यवाणी केली होती की 24 व्या वर्षात तिचे लग्न झाले नाही पाहिजे. नाहीतर हे लग्न तिच्यासाठी धोकादायक ठरु शकते. तसेच प्रत्युषा आपल्या जीवनात यश मिळवेल मात्र तिचा आकस्मिक मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. दुर्भाग्याने त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या जन्मानंतर तिच्या आजोबांनी तिची कुंडली बनवली होती. मात्र तिची कुंडली पाहून आजोबाही चकित झाले. त्यावेळी त्यांनी प्रत्युषा आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करेल असे सांगितले होते. मात्र तिच्या मृत्यूबाबतची भविष्यवाणी त्यांनी अभ्यासानंतर केली होती. प्रत्युषा आपल्या आजोबांची लाडकी नात होती.

मृत्यूच्या दिवशी अस्ताव्यस्त पडले होते सामान, घरात सापडल्या 150 पेक्षा जास्त सिगारेट्स...
- प्रत्युषा आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल यांच्या गोरेगाव स्थित हार्मनी अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर 703 मधून मुंबई पोलिसांना अंमली पदार्थ आणि दारू-बीअरच्या काही बाटल्या सापडल्या. बीअरच्या दोन बाटल्यांशिवाय पोलिसांना 150पेक्षा जास्त सिगारेट्स मिळाल्या.
- प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी तो, प्रत्युषा आणि त्यांची आणखी एका मैत्रीण गोरेगाव स्थित फ्लॅटवर त्यांच्यासोबत हजर होती.
- तिथे तिघांनी मद्यपान केले. मध्यरात्री त्याच्या मैत्रिणीने वांद्रा स्थित माऊंट मेरी चर्चमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. राहुल तिच्यासोबत चर्चमध्ये गेला.
- राहुलच्या सांगण्यानुसार, ते सकाळी चार वाजता परत आले आणि प्रत्युषासोबत खोलीत जाऊन झोपला.
- सकाळी उठताच राहुल आणि प्रत्युषामध्ये भांडण सुरु झाले. यादरम्यान प्रत्युषा दारू प्यायला लागली.
- राहुलने तिला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने ऐकले नाही.
- राहुलच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी दुपारी एक वाजता तो काही कामानिमित्त बाहेर गेला.
- त्याच्या एक तासाने त्याने प्रत्युषाला फोन केला. तिने अनेक फोन कॉल्स उचलले नाही.
- अखेर, प्रत्युषाने फोन उचलला तर राहुलने तिला जेवण पॅक करून आणू का असे विचारले. परंतु तिने नकार दिला.
- जेव्हा तो पुन्हा घरी आला तेव्हा दार बंद होते. खूप प्रयत्न केल्यानंतर दार उघडले नाही. त्याने शेजारच्या नोकराची मदत घेतली.
- राहुलने बाल्कनीतून घराचे दार उघडले आणि घरात प्रवेश करताच प्रत्युषाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला.
- घाबरलेल्या राहुलने त्याच्या काकांना आणि प्रत्युषाच्या पालकांना फोन करून माहिती दिली.
- त्यानंतर त्याने प्रत्युषाला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, एजाज खानने शेअर केला होता प्रत्युषाचा मृत्यूनंतरचा फोटो...