आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बालिका वधू'चे 1500 एपिसोड पूर्ण, पाहा आनंदी, दादी, शिवचा रिअल लाइफ अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकप्रिय टीव्ही मालिका बालिका वधूचे 1500 भाग पूर्ण झाले. यानिमित्ताने मुंबईत एक सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील अंधेरीस्थित लेवो रेस्तराँ आणि लाउंजमधअये आयोजित या पार्टीत मालिकेतील सर्व कलाकार आपापल्या स्टाइलमध्ये पोहोचले.
जुलै 2008मध्ये छोट्या पडद्यावर दाखल झालेली ही मालिका आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. या मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी तोरल रासपूत्र तिची ऑनस्क्रिन दादी आणि कुटुंबीयांसह पार्टीत दाखल झाली. शोमध्ये आनंदीच्या नणंदेची भूमिका साकारणारी सांची अर्थातच रुप दुर्गापाल आपल्या अंदाजात पार्टीत सहभागी झाली.
याशिवाय अनुप सोनी, स्मिता बन्सलसुद्धा आपल्या रिअल लाईफ लूकमध्ये पार्टीत दिसले. तर दादी सुरेखा सिकरी यांचा फॅशनेबल अंदाज येथे बघायला मिळाला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'बालिका वधू'च्या स्टार्सची सक्सेस पार्टीदरम्यान क्लिक झालेली रिअल लाइफची खास छायाचित्रे...