आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टीव्ही अभिनेत्रीने Telly Calender 2015साठी केले फोटोशूट, डेनिमसह परिधान केला लहंगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Telly Calender 2015च्या फोटोशूटमध्ये बरखा बिष्ट)
मुंबई: टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्टने काही दिवसांपूर्वी टेली कॅलेंडर 2015साठी फोटोशूट केले आहे. जॉर्डनमध्ये झालेल्या या फोटोशूटमध्ये तिने चमकदार शॉर्ट ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. या फोटोशूटमधील लूकविषयी बरखा सांगते, 'ब्लॅक माझ्या सौंदर्यात भर टाकतो. या एकमेव रंगात तुम्ही माझे वार्डरोब पाहू शकता. मला आनंद आहे, की त्यांनी मला फर्स्ट लूकसाठी ब्लॅक ड्रेस दिला.'

बरखाने दुस-या लूकमध्ये डेनिम ब्लू डेनिम व्हाइट ब्लाऊज आणि रंगेबेरंगी लहंगा परिधान केलेला होता. या लूकमध्ये नाकात नथ आणि आर्टिस्टक बेल्टने तिचे सौंदर्य खुलले होते. बरखानुसार, 'ती तीन वर्षांपासून या कॅलेंडरचा भाग आहे. यावेळी मला काहीतरी वेगळे परिधान करून वेगळे दिसण्याची इच्छा होती. त्यामुळे डेनिमसोबत ब्लाऊज आणि लहंगा परिधान केला होता. योगायोगाने माझ्या कल्पनेने काम केले आणि मी या लूकमध्ये यूनिक दिसत आहे. सर्व छायाचित्रे खूप छान आली आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बरखा बिष्टाने टेली कॅलेंडरसाठी केलेले फोटोशूट...