आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 9 Day 23: The Dirty Game Of Rishabh Mandana, BB House Turns Into Hotel

किश्वरला ऋषभने बनवले 'कुत्रा', पाहून बॉयफ्रेंड सुयश रडला ढसाढसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किश्वर मर्चेंट (इन्सेटमध्ये) सुयश राय)
मुंबई- 'बिग बॉस 9'च्या पहिल्या वाइल्ड कार्ड एंट्रीनंतर घरात बरेच बदल झाले आहेत. 23व्या दिवसाची सुरुवात 'खून चुसले...' गाण्याने झाली. थीमनुसार घरातील सदस्य एकमेकांसोबत वागताना दिसले.
बिग बॉस हॉटेलमध्ये आले तीन पाहूणे-
लग्झरी टास्कमधील बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेला ऋषभ सिन्हासोबत मंदानाला पाहूणे बनवून 'बिग बॉस' हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. या टास्कमध्ये इतर सदस्यांनी स्टाफ बनायचे होते. एकीकडे स्टाफना पाहूण्यांची खास काळजी घ्यायची होती. दुसरीकडे पाहूण्यांना स्टाफ मेंबर्सना त्रास द्यायचा होता. दुपारनंतर हॉटेलमध्ये तिसरी पाहूणी म्हणून सरगुण मेहताची एंट्री झाली होती.
बाथरुम केले घाणेरडे, घरात उघडले पार्लर-
बिग बॉस हॉटेलमधली पाहूणी सरगुण मेहताच्या एंट्रीनंतर घरात अनेक गोष्टी बदलल्या. त्यामुळे हॉटेल स्टाफ वैतागले. एकीकडे मंदानाने रोशेल आणि किश्वरकडून Manicure आणि Padicure करून घेतले. तिने अमनकडून खांदे दाबून घेतले. तसेच ऋषभ आणि सरगुणने बाथरुम अस्वच्छ करून ठेवले. पाहूण्यांनी शाकाहारी दिगंगनाला विना ग्लब्स चिकन बनवायचासुध्दा टास्क दिला.
किश्वरला बनवले कुत्रा, सुयशच्या डोळ्यात तरळले अश्रु-
ऋषभने सुयशला कुत्रा बनवले आणि तोंडात हाड पकडून आणण्याचा टास्क दिला. त्याने पाहूण्यांना खुश करण्यासाठी हा टास्क केला. स्वत:च्या मनोरंजनासाठी ऋषभ हाड फेकत राहिला आणि सुयश तोंडाने हाड उचलत राहिला. रात्री उशीरा सुयशऐवजी किश्वरला कुत्रा बनवण्यात आले. गार्डन एरियामध्ये ऋषभ हाड फेकत होता आणि किश्वर तोंडाने उचलताना दिसली. हे पाहूण किश्वरचा बॉयफ्रेंड सुयशला रजू कोसळले. प्रिन्स, अमन आणि युविकाने त्याला समजावले. नंतर प्रिन्स सुयशला सांगताना दिसला, की किश्वरला त्याने कुत्रा बनवले, आपण त्याला कोंबडी बनवू आणि मिळून कापू.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून फोटोंमधून पाहा 23व्या दिवशी काय-काय झाले...