आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B\'day Special Controversial Life Story Of Actress Roopa Ganguly

\'द्रौपदी\'च्या खासगी आयुष्याला आहे वादाची किनार, तीनदा केलाय आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एन्टरटेन्मेंट डेस्कः
टीव्ही अभिनेत्री रुपा गांगुली हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 49 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 वर्षांपूर्वी बी. आर. चोप्रांच्या गाजलेल्या 'महाभारत' या मालिकेत द्रौपदीची भूमिका वठवून ती घराघरांत प्रसिद्ध झाली होती.
रुपाचा जन्म कोलकाता येथील कल्याणीमध्ये 25 नोव्हेंबर 1966 रोजी झाला. तिने हिंदीसोबतच बंगाली सिनेमा आणि टेलिव्हिजनवर काम केले. द्रौपदीच्या भूमिकेतून प्रसिद्ध झाल्यानंतर तिने गौतम घोष यांच्या 'पोद्मा नोदीर माझी' (1993), अपर्णा सेन यांच्या 'युगांत' (1995) आणि रितुपर्णो घोष यांच्या 'अंतरमहल' (2006) या सिनेमांमध्ये काम केले.
तर छोट्या पडद्यावर 'करम अपना अपना', 'लव स्टोरी', 'वक्त बताएगा कौन अपना कौन पराया', 'कस्तूरी' आणि 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला.
खासगी आयुष्यात आले अनेक चढ-उतार
प्रसिद्धी, नाव, पैसा मिळवणा-या रुपाचे खासगी आयुष्य अनेक चढउतारांचे राहिले. रुपा गांगुलीने मेकॅनिकल इंजिनिअर अशलेल्या ध्रुब मुखर्जीसोबत 1992 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या चौदा वर्षांनी म्हणजे 2007 मध्ये हे दोघे विभक्त झाले. जानेवारी 2009 मध्ये त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यांना आकाश नावाचा एक मुलगा आहे.
नव-यापासून विभक्त झाल्यानंतर रुपा तिच्यापेक्षा वयाने 13 वर्षे लहान असलेल्या गायक प्रेमी दिब्येंदुसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. मुंबईत हे दोघे एकत्र राहात होते. मात्र लवकरच त्याच्यापासून ती वि'भक्त झाली.
स्टार प्लस वाहिनीवरील गाजलेल्या 'सच का सामना' (2009) या शोमध्ये रुपाने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक रहस्ये उघड केली. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्यातील निवडक गोष्टी सांगत आहोत...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'द्रौपदी'च्या खासगी आयुष्यातील रहस्ये...