मुंबईः सोनी टीव्हीवर नव्याने दाखल झालेली 'सूर्यपुत्र कर्ण' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. सध्या या मालिकेचे शूटिंग गुजरात येथील उमरगांव येथे सुरु आहे. शूटिंगदरम्यान आपापल्या भूमिकेत शिरलेले स्टार्स दिग्दर्शकाने कट म्हणताच मस्तीच्या मूडमध्ये येतात.
dainikbhaskar.com ने अलीकडेच शोच्या सेटवर पोहोचून स्टारकास्टसोबत बातचित केली. या मालिकेत कर्णाच्या आईची व्यक्तिरेखा साकारणारी मौली गांगुलीने सांगितले, "पौराणिक मालिकेत काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. शोचा भाग बनून मी खूप आहे. माझ्या व्यक्तिरेखेसाठी जड कॉश्च्युम आणि प्रॉपर भाषेची गरज आहे. सुरुवातीला थोडे कठीण गेले, मात्र आता सर्व नीट जमतंय. मालिकेतील मुले ऑफस्क्रिनसुद्धा खूप चांगले वागतात. आमच्यात चांगली केमिस्ट्री जमली आहे."
मौली गांगुलीचे ऑनस्क्रिन पती आनंद सुर्यवंशीने सांगितले, "मुंबईपासून दूर शूटिंग करत असल्याने घरच्यांना मीस करतोय. मात्र अभिनेता असल्याने भूमिकेसाठी हे करावे लागते. प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे, या मुलांसोबत काम करताना खूप मजा येतेय."
बालकलाकारांमध्ये कर्णाची भूमिका विशेष बंसल आणि त्याच्या भाऊ शोनाची भूमिका उजैर बसर साकारत आहे. दोन्ही बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'सूर्यपुत्र कर्ण'च्या ऑन लोकेशनची छायाचित्रे...
सर्व फोटोजः अजीत रेडेकर