आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बिग बॉस\'च्या घराबाहेर पडली बेनाफशा, बोल्डनेसवर म्हणाली- \'त्याचे मला काही वाटत नाही\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेनाफशा सुनावाला आणि प्रियंक शर्मा - Divya Marathi
बेनाफशा सुनावाला आणि प्रियंक शर्मा

मुंबई - 'बिग बॉस-11' च्या 'विकेंड का वार'मध्ये बेनाफशा सुनावाला घरा बाहेर पडली. घरातून बाहेर पडणारी बेनाफशा 8वी कंटेस्टंट आहे. यावेळी तीन जण नॉमिनेट झाले होते. त्यात बेनाफशासोबत हिना खान, सपना चौधरी होती. यामध्य बेनाफशाला सर्वात कमी व्होट मिळाले आणि ती घराबाहेर पडली. घराबाहेर पडण्यापूर्वी बेनाफशाने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. बाहेर आल्यानंतरही तिला याचा खेद ना खंत होती. ती म्हणाली, 'मला याची काहीच लाज वाटत नाही.' 

 

प्रियंकच्या अधिक जवळ होती... 
बिग बॉसच्या घरात बेनाफशा आणि प्रियंक शर्मा हे दोघे एकमेकांच्या फार जवळ होते. यांच्यात एवढी जवळीक होती, की ते एकच बेड शेअर करतानाही दिसले होते. दोघांना किस करतानाही पाहिले गेले होते. 
- घराबाहेर पडल्यानंतर बेनाफशा म्हणाली, ''मी आणि प्रियंक फक्त मित्र आहोत, मी माझ्या सर्वच मित्रांची गळाभेट घेते आणि त्यांना किस करुन त्यांना भेटते. मी त्याच्यासोबत बेडवर झोपले होते, मात्र मला तो भावासारखा आहे. एकदा मी त्याला म्हटले होते, की त्याच्याबद्दल माझ्या मनात वेगळ्या भावना आहेत. मात्र त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. वास्तविक, नंतर मी त्याला सांगितले होते की मी जोक करत होते.' 
- बेनाफशा म्हणाली, होय, हे खरे आहे की आम्ही बेड शेअर केला होता. कारण त्या दिवशी प्रियंकचे भांडण झाले होते आणि तो अपसेट होता. मात्र नंतर मी माझ्या बेडवर गेले होते. 

 

'विकेंड का वार'मध्ये आली दीपिका पदुकोन 
- 'विकेंड का वार'मध्ये दीपिका पदुकोन सहभागी झाली होती. तिने घरातील सर्व कंटेस्टंटला एक टास्क दिला होता. त्यासोबतच तिने सर्वांसोबत घुमर डांस केला. यावेळी दीपिकाने शिल्पा शिंदेला पद्मावतीचा मुकुट घातला आणि अलाऊद्दीन खिलजीची भूमिका पुनीश शर्माने निभावली. आकाशला गाणे म्हणण्याचा टास्क देण्यात आला होता. तर, हितेन आणि अर्शी खानला रोमांसचा टास्क देण्यात आला होता. 
- दीपिका बिग बॉसच्या सेटवर येण्याआधी शोचा होस्ट सलमान खानसोबत मस्ती करताना दिसली. दीपिका रेड कलरच्या आऊटफिटमध्ये गॉर्जियस दिसत होती.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बेनाफशाने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो.. 

बातम्या आणखी आहेत...