आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता 'CINTAA'वर भडकली 'अगूरी भाभी', म्हणाली- 'प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शिंदे - Divya Marathi
शिल्पा शिंदे
मुंबई: 'भाभीजी घर पर है' या टीव्ही मालिकेत 'अंगूरी भाभी'चे पात्र साकारणा-या शिल्पा शिंदेने आता सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA)च्या विरोधात लढाई सुरु केली आहे. अलीकडेच शिल्पाने एका पत्रकार परिषदेत CINTAAच्या विरोधात काही व्हिडिओ आणि फोटो रिव्हिल केले आहेत. यादरम्यान CINTAAचे एक्स मेंबर आरिफ शेखसुध्दा शिल्पासोबत होते.
शिल्पाने केले नवीन खुलासे...
पत्रकार परिषदेत शिल्पाने सांगितले, 'CINTAAला टीव्ही आर्टिस्टच्या मदतीसाठी बनवण्यात आले आहे. परंतु आम्हाला मीडियाची मदत घ्यावी लागत आहे. कारण ते आमची साथ देत नाहीये. CINTAA कलाकारांसाठी काम करत नाहीये. माझ्या प्रकरणात ते म्हणाले, की ते माझी साथ देणार नाहीत, कारण मी रागीट आहे. परंतु त्यांनी माझा असा स्वभाव कधी पाहिला. मी कमिटीमध्ये याचीदेखील तक्रार केली आहे. आमच्या सेटवर बालकलकारांना चांगली वागणूक दिली जात नाही. ना त्यांना योग्य पद्धतीने जेवण दिले जाते. परंतु CINTAAने या प्रकरणात काहीच अॅक्शन घेतली नाही. माझ्या प्रकरणात मला कायद्यांची मदत घ्यावी लागली आणि जर दुस-या कलाकारांसोबत चुकीचे घडत असेल तर मी त्यांची मदत करेल.'
5 वर्षांपासून सुरु आहे लढाई...
या प्रकरणात आरिफ शेख म्हणाले, 'आमच्यासोबत चांगली वागणूक केली जात नाही आणि आम्हाला वेळेवर पैसे दिले जात नाही. 'सावधान इंडिया'सारख्या शो हाय TRPसह चालतात. परंतु आम्हाला 6 महिन्यांनी पगार दिला जातो. आम्ही CINTAAमध्ये चालू असलेल्या भ्रष्टाचाराविषयी जे खुलासे करू त्यातही कायद्याची मदत घेऊ. आम्ही मागील 5 वर्षांपासून लढत आहोत. परंतु मला कमिटीच्या बाहेर फेकण्यात आले.'
CINTAAच्या स्पोक्सपर्सनची रिअॅक्शन...
दुसरीकडे आमच्या प्रतिनिधीसोबत बोलताना CINTAAच्या स्पोक्सपर्सन आणि टीव्ही अभिनेता सुशांत सिंह म्हणाला, 'जर शिल्पा कायदेशीर पाऊल उचलत असेल तर मीही कायद्याची मदत घेईल. जर शिल्पाने दिलेले पूरावे खरे असतील तर मी दोषींना तुरुंगात पाठवेल. परंतु जर हे पूरावे खोटे निघाले तर मी शिल्पाच्या विरोघात अॅक्शन घेईल.'
कसा सुरु झाला वाद?
- 'भाभीजी घर पर है' मालिकेची सुरुवात मागील वर्षी 2 मार्चपासून झाली. या शोमुळे शिल्पाला लोकप्रियता मिळाली.
- काही महिन्यांपासून शोचे निर्माते आणि टीमसोबत तिचा मानधनावरून वाद सुरु आहे.
- अशाही बातम्या आल्या होत्या, की दोनवेळा शिल्पाचे मानधन वाढवण्यात आले होते परंतु शिल्पा नाराजच होती.
- शिल्पाला इतर चॅनल्ससोबत काम करायचे होते. परंतु निर्माते आणि टीम तिला अडवत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा त्या पूराव्यांची कॉपी, जे शिल्पा शिंदेने CINTAAच्या विरोधात सादर केले आहेत...
बातम्या आणखी आहेत...