आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भाभीजी\'ने सांगितले इंडस्ट्रीतील कटू सत्य, मराठमोळ्या अॅक्ट्रेसला या अडचणींचा करावा लागला सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळः छोट्या पडद्यावर भाभीजी म्हणून प्रसिद्ध झालेली मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने एक धक्कादायक खुलासा केला आहे. आर्टिस्ट असोसिएशन निर्मात्यांसोबत मिळून कलाकारांचे शोषण करत असल्याचा खळबळजनक आरोप शिल्पाने लावला आहे. तिने या ग्लॅमर दुनियेच्या पडद्यामागील कटू सत्य सांगितले आहे. शनिवारी शिल्पा भोपाळमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळई तिने अनेक गोष्टींचा उलगडा भास्कर सोबत बोलताना केला.

शिल्पाने सांगितले, आम्ही तुला उभे केले आहे, नाही तर तुझी लायकी काय...
- भाभीजी घर पर है या मालिकेच्या निर्मात्यांसोबतच्या वादाविषयी शिल्पाने सांगितले, की मी दुस-या कुठल्याही ठिकाणी काम करु नये, म्हणून या मालिकेचे निर्माते मला एक्सक्लुझिविटी कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवणार होते.
- मला कपिल शर्माचा शो ऑफर झाल्याची माहिती निर्मात्यांना कळाली होती. मला यासाठी दोन दिवसांची सुटी हवी होती.
- तेव्हा निर्मात्यांनी अतिशय उद्धटपणे मला विचारले, की तुला किती पैसे पाहिजे ते सांग आणि हा एक्सक्लूझिविटी कॉन्ट्रॅक्ट साइन कर. आम्ही तुला उभे केले आहे, नाहीतर तुझी लायकी काय होती, असे निर्माते मला म्हणाले होते.
- मी त्यांचा हा एक्सक्लूझिविटी कॉन्ट्रॅक्ट साइन केला नाही आणि भविष्यात करणारदेखील नाही. तेव्हा त्यांनी माझी मीडिया आणि प्रत्येक ठिकाणी बदनामी सुरु केली.
कलाकारांना नसतं त्यांचं खासगी आयुष्य...
- यावेळी शिल्पाने सांगितले, की टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करणा-या कलाकारांना त्यांचे खासगी आयुष्य नसतं. आजारी असो, किंवा घरात कुणाचा मृत्यू झाला असो, आम्हाला सतत काम करावे लागते.
- आर्टिस्ट असोसिएशन आहे सिन्टा. मात्र तीदेखील निर्मात्यांसाठी काम करते. सगळे नियम कलाकारांच्या विरोधात असतात. याशिवाय शोचा कॉन्ट्रॅक्ट वन साइडेड असतो. कलाकार गरजेपोटी ते साइन करत असतात.

दुसरी भाभीजी कधीच खरी वाटू शकणार नाही....
- मी 'भाभीजी घर पर है' ही मालिका सोडल्यानंतर त्याचा एक एपिसोड पाहिला. खूप वाईट वाटले.
- दुसरी 'भाभीजी' बनलेली अभिनेत्री माझी नकल करत आहे, ती कधीच खरी वाटू शकणार नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मराठमोळ्या शिल्पाची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...