आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनदा मानधन वाढवल्यानंतरही \'अंगुरी भाभी\'ने दाखवले नखरे, निर्मात्यांनी बजावली नोटिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगूरी भाभी अर्थातच शिल्पा शिंदे - Divya Marathi
अंगूरी भाभी अर्थातच शिल्पा शिंदे
मुंबई: 'भाभीजी घर पर है' शोच्या निर्मात्यांच्या सांगण्यानुसार, अंगूरी भाभी अर्थातच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे मानधन वर्षातून दोनवेळा वाढवले आहे. तरीदेखील ती नखरे दाखवत आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, शिल्पाला कायदेशीर नोटिससुध्दा पाठवण्यात आली आहे. divyamarathi.comसोबत एक्सक्लूसिव्ह मुलाखतीत शोची निर्माती बेनिफेर कोहलीने सांगितले, की शिल्पाने तिच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. तिच्या सांगण्यानुसार, शिल्पाने काहीही अॅप्लीकेशन देता शोचे शूटिंग बंद केले आहे.
काय म्हणाली निर्माती बेनिफेर...
- बेनिफेरने सांगितले, 'मानधन न वाढवणे, कस्ट्युम डिझाइनर उपलब्ध न करणे, मानसिक त्रासासारखे सर्व आरोप चुकीचे आहेत.'
- करारानुसार, 'तिच्या मानधनात दोन वर्षांत वाढ करायची होती. परंतु वर्षभरात तिचे मानधान दोनदा वाढवण्यात आले.'
- तिला एका चांगला कॉस्ट्युम डिझाइनर उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु तिने त्याला को-ऑपरेट केले नाही.
- एवढेच नव्हे, 'हे माझ्या कामाच्या हिशोबाने परफेक्ट नाहीत', असे म्हणून तिने 6-7 कॉस्ट्युम डिझाइनर्सना हाकलून लावले.
- ती शूज, ज्वेलरी आणि मेकअपसाठीसुध्दा पैसे मागत होती.
- तिने चॅनलकडून 20 लाखांपेक्षा जास्त पैसे घेतले आहेत. या अटीवरच तिने काम केले. स्पष्ट आहे, की तिने दुस-या चॅनलवर काम करणे आम्हाला कसे पटेल?
- ती आमच्या प्रसिद्ध मुख्य पात्रांपैकी एक आहे आणि तिचा अहंकार विनाकारण शोला भोगावा लागत आहे.
सेटवर येते 4-5 तास उशीरा...
- निर्मात्यांनी शिल्पाला अनप्रोफेशनल असल्याचा करार दिला आहे.
- त्यांनी सांगितले, 'अनेकदा असे होते, की आमच्या इतर कलाकारांना तिच्यामुळे वाट पाहावी लागते. ती सेटवर 4-5 तास उशीरा येते.'
- करारानुसार, तिने शो सोडण्यापूर्वी 90 दिवस आधी नोटिस द्यावी. परंतु तिने कोणतेही अॅप्लिकेशन न देता शूटिंग बंद केले.
- गरजेचे नाही, की एखादे चांगले पात्र साकारणारा अभिनेता ख-या आयुष्यात चांगला असतो.
- चॅनलला अडचणींचा सामना करावा लागतोय. म्हणून आम्ही शिल्पाला कायदेशीर नोटिस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
चॅनलला आहे नवीन चेह-याचा शोध...
- divyamarathi.comने बेनिफेरला विचारले, की चॅनल नवीन चेह-याच्या शोधात आहे.
- यावर तिने सांगितले, 'आमची इच्छा आहे, की शिल्पाने पुन्हा परत यावे. कारण तिने मोठी रक्कम घेतली आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'भाभीजी घर पर है'चे काही स्टिल्स...