आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘लौट आओ त्रिशा’ मधून अभिनेत्री भाग्यश्री परततेय टेलिव्हिजनवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही चेहे-यांना ओळखीची गरज नसते. 'मैने प्यार किया' या तिच्या पदार्पणातच संपूर्ण पिढीच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी भाग्य पटवर्धन आपली जादू दाखवायला परततेय छोटया पडद्यावर, लाईफ ओके च्या‘लौट आओ त्रिशा’मधून. या शो चा फस्ट लूक टेलिव्हिजनच्या पडदयावर प्रक्षेपित होईल त्यांच्या प्रोमो मधून या शनिवारी. भाग्यश्रीसह टेलिव्हिजनवरील काही अतिशय प्रतिभावंत व यशस्वी कलाकारही या मंचामुळे एकत्र येत आहेत.
‘लौट आओ त्रिशा’ मध्ये काम करण्यासाठी उत्सुक असलेली भाग्यश्री म्हणते, ‘मनोरंजनाच्या स्पेस मध्ये येऊन गेल्याला आता बराच काळ झाला आणि ‘लौट आओ त्रिशा’ मधून लाईफ ओकेसाठी काम करताना मी फार खूश आहे. यातील कारस्थाने आणि माझ्या कॅरॅक्टरचा भाग असलेली नात्यांची गुंतागुंत यांमुळे मी या शोकडे आकर्षित झाले व मला या शो मध्ये सहभागी व्हावेसे वाटले. चांगले आणि वाईट असे काहीही नसते. आपण सर्व या दोहोंचे मिश्रण आहोत. प्रत्येक नात्याला अनेक थर असतात व ते दिसून येण्यासाठी एखादया जबरदस्त आघाताची गरज असते. एका आईचा आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध हळूहळू तिच्या सर्व नात्यांचे खरे चेहरे उघड करतो.
आपली हरवलेली मुलगी त्रिशा हिचा शोध घ्यायला घराबाहेर पडलेली आई अमृता स्वाईका हिची भूमिका भाग्यश्री साकारत आहे. बाहेरच्या जगाला स्वाईका हे एकत्र हसून खेळून राहणारे ‘परफेक्ट’ कुटूंब वाटते. पण त्रिशाला शोधताना ती तिचे कुटूंब व नात्यांबद्दलची काही हादरवून सोडणारी सत्य समोर आणते.
'लौट आओ त्रिशा'ची निर्मिती आहे ‘24 फ्रेम्स’च्या नंदिता मेहरा व भैरवी रायचुरा यांची. फसव्या कारस्थानांनी, नाटयपूर्णतेने भरलेली ही कथा पूर्णपणे ग्रासून टाकणा-या रहस्यमयतेचा विश्वास देते. ही मालिका दर्शकांना नक्कीच मनोरंजन करून खिळवून ठेवेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.