(सलमान खान आणि अथिया शेट्टीसोबत भारती सिंह)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'कॉमडी नाइट्स बचाओ' या कॉमेडी शोच्या सेटवर पोहोचला होता. तो येथे त्याच्या प्रॉडक्शनच्या 'हीरो' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्याच्यासोबत सिनेमाचे मुख्य कलाकार अथिया शेट्टी आणि सूरज पांचोलीसुध्दा दिसले.
शोचे स्टार्स कृष्णा अभिषेक, भारती सिंह, सुदेश लहरी, करण वाही आणि अनिता हसनंदानी यांनी 'हीरो'च्या स्टार्ससोबत धमाल केली. यावेळी भारतीने अथियाला विनोदी स्वरात 'हॉकी स्टिक' म्हटले.
भारती म्हणाली, 'पहिल्यांदा कलर्सवर हॉकी स्टिक आणि फुटबॉल एकत्र दिसत आहे.' भारतीने येथे फुटबॉल स्वत:ला म्हटले होते. सेटवर भारतीने सलमानसोबत फनी डान्स सुध्दा केला.
निखिल आडवाणीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'हीरो' सिनेमा शुक्रवारी (11 सप्टेंबर) रिलीज झाला. 'हीरो स्पेशल' 'कॉमेडी नाइट्स बचाओ' शनिवारी रात्री 10 वाजता दाखवणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'कॉमेडी नाइट्स बचाओ'मध्ये पोहोचलेल्या सलमान, सूरज आण अथियाची धमाल-मस्ती...