आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कॉमेडियन भारतीने खरेदी केली मर्सडीज, ट्विटरवर व्यक्त केला आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः कॉमेडियन भारती सिंहने अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मर्सडीज बेंज GL350 कार खरेदी केली. भारतीची ही तिसरी कार आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत लल्ली या नावाने प्रसिद्ध असलेल्या भारतीकडे स्विफ्ट डिझायर आणि ऑडी Q5 या लग्झरी गाड्या आहेत.
divyamarathi.com ला दिलेल्या मुलाखतीत भारतीने सांगितले, ''हा क्षण माझ्यासाठी स्वप्नवतच आहे. मुंबईत येऊन मला सहा वर्षे झाली आहेत. सहा वर्षांत माझी अनेक स्वप्ने पूर्ण झाली आहेत. ही माझी तिसरी कार आहे. ही कार चालवण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. सर्वप्रथम गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेईल आणि नंतर घरी जाईल. खरं सांगू, या कारला मी जीवापाड जपेल. कारण आजवर मी स्वतःला एवढे महागडे गिफ्ट कधीही दिलेले नाही. ही कार माझ्यासाठी दुसरे घरच आहे. मुंबईचे ट्राफिक बघता मुंबईकर आपला जास्तीत जास्त वेळ कारमध्येच घालवतात.''
भारतीच्या या नवीन कारची किंमत जवळजवळ एक कोटी रुपये आहे. ही लग्झरी कार खरेदी केल्याचा आनंद भारतीने ट्विटरवरसुद्धा व्यक्त केला. तिने ट्विट केले, "My new car #MercedesBenz GL350 thanx God for everything... thank you Frnd ur love and support...blessed..."
2008 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोमुळे भारती पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली होती. सध्या ती 'इंडियाज गॉट टॅलेंट' हा शो होस्ट करताना दिसतेय. याशिवाय कलर्स वाहिनीवरील 'कॉमेडी क्लासेस' या शोमध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, भारतीची तिच्या नवीन कारसोबतची खास छायाचित्रे...