आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bharti Singh Hiding Relationship With Alleged Fiancé Harsh Limbachiyaa?

मानलेल्या 22 वर्षीय भावासह भारतीने केला साखरपुडा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ती नेहमी त्याला भैय्या म्हणून हाक माराययची, मात्र आता बातमी आहे की या दोघांमध्ये दुसरेच नाते निर्माण झाले आहे. आम्ही बोलतोय ते स्टॅण्ड अप कॉमेडियन भारती सिंह आणि कॉमेडी सर्कसचे लेखक हर्ष लिम्बचिया यांच्याविषयी. ऐकिवात आहे, की भारती आणि हर्षने साखरपुडा केला असून लवकरच हे दोघे लग्नगाठीत अडकणार आहेत.
सुत्रांच्या मते, भारतीने हर्षसोबतच्या आपल्या नात्याचा नेहमीच इंकार केला. ती नेहमी म्हणते, की आमच्यात बहीण-भावाचे नाते आहे. मात्र कॉमेडी सर्कसशी निगडीत लोकांना या दोघांच्या कथित नात्याविषयी सर्वकाही ठाऊक आहे.
अन्य सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारती आणि हर्षने साखरपुडा केला आहे. मात्र भारती हर्ष आणि तिच्या वयात असलेल्या अंतरामुळे चिंतेत आहे. भारती 29 वर्षांची असून हर्षचे वय केवळ 22 वर्षे आहे.
इतकेच नाही तर असेही ऐकिवात आहे, की गेल्या वर्षी भारतीने हर्षला एक कारसुद्धा गिफ्ट केली होती.
एका मुलाखतीत हर्षने म्हटले होते, की तो केवळ भारतीसाठीच लिहितो. तिच्यासोबत ताळमेळ बसवणे त्याच्यासाठी सोपे आहे.
साखरपुड्याच्या बातम्यांविषयी भारतीचे म्हणणे आहे, की जेव्हाही ती लग्नाचा निर्णय घेईल, तेव्हा ती नक्कीच याविषयी बोलेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा हर्ष आणि भारतीची खास छायाचित्रे...
नोट - ही सर्व छायाचित्रे भारतीच्या ट्विटर अकाऊंटवरुन साभार घेण्यात आलेली आहेत...