आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#weddingdiaries: भारतीकडे झाला बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, लाल लहेंग्यात दिसली थिरकताना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 3 डिसेंबर रोजी कॉमेडियन भारती सिंग आणि लेखक हर्ष लिंबाचिया लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यापुर्वी मुंबईत त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. अलीकडेच हर्षच्या घरी माता की चौकी ठेवण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी भारतीच्या घरी पंजाबी पद्धतीने बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लाल रंगाच्या लहेंग्यात भारती अतिशय सुंदर दिसली. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी भारतीसाठी हा लहेंगा डिझाइन केला होता. कार्यक्रमात भारती थिरकताना दिसली. 


फ्रेंड्स आणि टीव्ही सेलेब्स झाले होते सहभागी...
भारतीच्या बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला तिच्या कुटुंबीयांसोबत टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी उपस्थिती लावली होती. भारतीने या कार्यक्रमाचे निवडक फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोला तिने कॅप्शन दिले, 'Day 1 of #weddingdiaries❤️'. 


गोव्यात भारती-हर्षचे लग्न होणार आहे. पुनीता गुप्ता यांनी अतिशय हटके पद्धतीने भारती-हर्षची लग्नपत्रिका डिझाइन केली आहे. खास दिल्लीवरुन ही लग्न पत्रिका तयार करण्यात आली आहे. या पत्रिकेवरुन हे एक बीच थीम वेडिंग असणार हेही दिसून येते. पत्रिकेच्या कव्हरवर शंख शिंपल्यांचे डिझाईन आहे. या डिझाइनच्यामध्ये भारती आणि हर्ष याचे नाव लिहिलेले आहे. बीच थीम असल्यामुळे पत्रिकेच्या बॅकग्राऊंडला अॅक्वा-ब्लाईंड कलर आणि समुद्राचा फील देण्यात आला आहे. पत्रिकेच्या आत दोघांचा फोटो दिसतो. या फोटोमध्ये भारतीने हर्षला तिच्या खांद्यावर उचलून घेतले आहे आणि या फोटोवर 'दुल्हा हम ले जाऐंगे' असे मोठ्या अक्षरात लिहिले गेले आहे. ही पत्रिका एका पांढऱ्या लाकडाच्या छोट्या पेटीत लॉक करुन पेटी निळ्या रंगाच्या रिबीनने सजवली आहे.

 

हनीमूनसाठी ते कपल महिन्याभरासाठी युरोप ट्रीपला जाणार आहेत. ग्रीस, स्पेन, बारसालोना, इटली या ठिकाणी हे कपल भेट देणार आहे. भारती आणि हर्ष गेल्या अनेक वर्षांपासून नातेसंबंधात आहेत. याचवर्षी त्यांनी रोका केला होता. हे जोडपे प्रेक्षकांसमोर पहिल्यांदा ‘नच बलिये’मध्ये एकत्र आले होते.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, भारतीच्या बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाची खास छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...